फोलोवर्स

Saturday, 11 August 2018

प्रधानमंत्री बालिका योजना स्कॅम




नमस्ते दोस्तो,

पिछले 3 दिनो से मुझे व्हाट्सअँप पे एक मेसेज आ रहा है जिसमे ऐसे बताया गया है की, "प्रधानमंत्री द्वारा 1 से 18 साल की बालिकाओ की निःशुल्क 10 हजार का चैक दिया जा रहा है. बालिकाओं के भविष्य के लिए इस योजना को चालू किया गया है । आवेदन करने की अंतिम तिथि 15 अगस्त है तो जल्दी करें और इस मैसेज को अपने सभी दोस्तों भेजें ताकि इस योजना का लाभ सभी को मिल सके"

इसमे एक लिंक भी दी गयी है जो गव्हर्नमेंट डोमेन जैसी ही दिखती है. उसमे https भी है और gov.in भी.  पर अगर आप ध्यान से देखोगे तो वो लिंक (-gov.in) है बल्की गव्हर्नमेंट की ओरिजनल लिंक होती है (.gov.in).  ये सिर्फ एक डेटा कलेक्शन टेक्निक है जिसमे लोगो को फसाया जाता है.  ऐसेही कुछ दिन पहले डी-मार्ट व्हाउचर स्कॅम हुवा था जो मैने नीचे दिये गये व्हिडीओ लिंक में समझाया हैं.  ऐसी लिंक के पीछे क्या कारण हो सकते है और उसमे क्या सावधानी बरतनी चाहिये वो आपको समज आयेगा.

https://www.youtube.com/watch?v=VSHUaJOznhM


ईस मेसेज को आप आपके यहा पे सेव्ह कर लिजिए और अगर आपको ऐसे कोई मेसेज आये तो उन्हे ये मेसेज रिप्लाय मे भी भेज दिजिये.  अपने देश में गलत हॊ रही बातो को रोकना एक भारतीय होने के नाते हमारा फर्ज है. 

जय हिंद.
सुबोध अनंत मेस्त्री
आपका टेक फ्रेंड
9221250656

Saturday, 26 May 2018

स्पॅम कॉल्स आणि ऑनलाईन फ्रॉड



सकाळी माझ्या बिजनेस ग्रुपच्या एका सरांचा मिस्डकॉल पाहिला.  मी झोपेतून उठण्याआधीच त्यांचा कॉल येऊन गेला होता.  मी कॉल केला तेव्हा ते थोड्या गोंधळलेल्या अवस्थेत वाटत होते.  मी शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळालं की सकाळी कुणीतरी त्यांना फसवून त्यांच्या अकाउंटमधून ५०००० रुपये काढले होते.  त्यांनी त्यांच्या चाकणच्या फ्लॅटचं लाईटबिल भरलं होतं. समोरच्या भामट्याने वीजवितरण केंद्रातून बोलतोय असं भासवून तुमच्याकडून जास्त अमाउंट भरली गेली आहे व ती परत करायची आहे असं सांगून त्यांच्याकडून ए. टी. एम कार्डसकट सगळी माहिती घेतली व पैसे लंपास केले.   त्यांनी लाईटबिल भरलंय हे त्या भामट्याला कसं समजलं हे अजून आमच्यासमोर प्रश्नचिन्ह आहेच कारण पोलीस कम्प्लेन्टनंतर त्याच लोकेशन ट्रॅक केल्यावर तो झारखंडचा निघाला. आतापर्यंत तुमचं कार्ड ब्लॉक झालंय आणि ते ओपन करण्यासाठी तुमच्या डिटेल्स द्या असे सांगणारे फ्रॉड कॉल बरेच आले होते पण अशी केस माझ्यासमोर पहिल्यांदा होती.  जर असं कुणासोबत झालं तर एकदम घाबरून जाऊ नका.  हे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.   कारण सरांचे पैसे परत मिळवण्यात आम्ही यशस्वी झालो.

असे फ्रॉड करून चोरलेले पैसे भामटा सरळ त्याच्या अकाउंटला घेत नाही.  तो असे पैसे दोन ठिकाणी फिरवू शकतो.

1. कोणत्याही शॉपिंग साईटवर नकली अकाउंट तयार करून त्यावरून शॉपिंग करू शकतो.

2. फोनपे, एअरटेल मनी, पे टी एम अशा पद्धतीच्या डिजिटल वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो व नंतर त्यावरून शॉपिंग करू शकतो.  यातही मोबाईल नंबर त्याचा स्वतःचा नसतो.


असे झाल्यास आपल्याला लगेचच पुढील ऍक्शन घ्यायच्या आहेत.

१.  आपलं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड कस्टमर केअरला फोन करून लगेच ब्लॉक करायचं.

२. आपल्या अकाउंटमधून नक्की कुठे पैसे ट्रान्सफर झाले आहेत ते बँक स्टेटमेंटमधून कन्फर्म करून घ्यायचे किंवा कस्टमर केअरला फोन लावून कन्फर्म करायचं.

३. जर पैसे शॉपिंग साईटवर वापरले गेले असतील किंवा कोणत्या डिजिटल वॉलेटमध्ये वापरले गेले असतील तर त्यांच्या कस्टमर केअरला (अमेझॉन असेल तर अमेझॉन कस्टमर केअर किंवा फोनपे असेल तर त्यांचे कस्टमर केअर) फोन करून आपले ट्रानजॅक्शन डिटेल्स द्यायचे व ती ऑर्डर स्टॉप करायला सांगून व तो अकाउंट ब्लॉक करायला सांगून पैसे रिफण्ड करायला सांगायचे.  आपली अकाउंट स्टेटमेंट, त्या बाबतीत आलेले एस. एम. एस यांचा स्क्रीनशॉट, ट्रानजॅक्शनचा टाईम, बँकेचे नाव व अकाउंट नंबर या सगळ्यांचा मिळून एक ईमेल सुद्धा पाठवून द्यायचा.

४. पोलिसांत तक्रार करायला विसरायचं नाही.

ही पाऊलं लगेच उचलली गेली व डिटेल्स कन्फर्म झाले की तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला काही दिवसात पुन्हा येतात.  त्यामुळे असं काही घडलंच तर डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा लागलीच कामाला लागा.

खालील गोष्टींची काळजी घ्या:

१. स्वतःचे महत्वाचे डॉक्युमेंट्स कुणाला मोबाईल सिमकार्ड घेण्यासाठी देऊ नका.  ते कार्ड तुमच्या नावावर रजिस्टर होत आणि अशा फ्रॉडमध्ये तो नंबर वापरला गेला तर तुम्ही गोत्यात येऊ शकता.

२. तुमचा ए. टी. एम. पिन किंवा मोबाईलवर आलेला ओ. टी. पी. कधीही कुणालाही शेअर करु नका.  बँका तर नेहमी याबाबतीत जाहिरात करत असतातच.

याव्यतिरिक्त काही असेल तर मी आहेच 😊

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
तुमचा तंत्रज्ञान मित्र
९२२१२५०६५६

#techiteasier #doyouknow #jeevanrang #ileadmylife #swarajyainfotech #onlinefrauds #spamcallers

Wednesday, 16 May 2018

जीमेलचे नवे फीचर्स




नमस्कार,

ईमेल सर्विसमध्ये सध्या अग्रेसर असणाऱ्या जीमेलने  डेस्कटॉप व्हर्जन साठी नुकतेच काही नवे फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत ज्याने आपली बरीच कामे सोपी होणार आहेत आणि स्मार्ट अनुभवही आपल्या वाट्याला येणार आहे.

नवे फीचर्स वापरण्यासाठी जीमेल पेजच्या उजव्या बाजूला असणाऱ्या गेअर आयकनवर क्लिक करायचं आहे  (इमेज १) आणि त्यामध्ये "Try new gmail" क्लिक करायचं आहे (इमेज २).   हे ऑप्शन घेतल्यानंतर नवा इंटरफेस तुमच्या स्क्रीनवर लगेच लोड होईल.

(१)

(२)

काय आहेत नवे फीचर्स?

१.  अटॅचमेंट प्रिव्हिव :
तुमचा ई-मेल ओपन न करताहीआता तुम्हाला अटॅचमेंट ओपन करता येऊ शकतात (इमेज ३)


(३)


२. मेल ऑपेरेशन शॉर्टकट:
ई-मेलवर माऊस घेऊन गेल्यानंतर अर्काइव्ह, डिलीट, मार्क अँज रीड आणि स्नूज असे ऑप्शन दिसतात जेणेकरून त्या ईमेल संबंधी ऑपरेशन्स लगेच करता येऊ शकतात. (इमेज ४)

(४)

३. स्नूज मेल:
या व्हर्जनमध्ये स्नूज ईमेलचा नवा पर्याय देण्यात आला आहे.  जसं आपण अलार्म स्नूज करून ठेवतो तस तुम्हाला एखादा ईमेल नंतर रेफर करायचा असेल तर तुम्ही त्या ईमेलला स्नूज करून ठेवू शकता.  जेणेकरून तुम्ही सेट केलेल्या वेळी तो ईमेल तुम्हाला मेलबॉक्समध्ये परत दिसेल (इमेज ५ आणि ६)

(५)

(६)


४. कॅलेंडर, कीप आणि गुगल टास्क जीमेलमधूनच :
जीमेल बरोबर बऱ्याच मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे कॅलेंडर, कीप आणि गुगल टास्क तुम्ही जीमेल मधूनच वापरू शकता जेणेकरून त्यासाठी तुम्हाला वेगळी विंडो ओपन  करण्याची गरज नाही. (इमेज ७)

(७)

५. सिक्रेट ईमेल विथ एक्सपायरी:
एखादा ईमेल तुम्हाला समोरच्या व्यक्तीला सिक्रेटली पाठवायचा असेल आणि तो ईमेल काही वेळानंतर ओपनच होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते सध्या करू शकता.

त्यासाठी ईमेल पाठवताना कंपोज मेलमध्ये उजवीकडे खाली तुम्हाला "Turn Confidential Mode On/ Off" असा ऑप्शन दिसेल (इमेज ८)

(८)

त्यावर क्लिक केल्यावर तो मेल किती वेळानंतर नाहीसा व्हावा (उदा. १ दिवसानंतर किंवा आठवड्यानंतर) अशी सेटिंग तुम्ही सिलेक्ट करू शकता. (इमेज ९)

(९)

जर तुमची ईच्छा असेल कि तो ईमेल फक्त योग्य व्यक्तीनेच वाचावा तर तुम्ही "SMS Passcode" हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता जेणेकरून तुम्ही ईमेल सेंड करताना तुम्हाला मोबाईल नम्बर विचारला जाईल.  (इमेज १०)

(१०)

जेव्हा समोर ईमेल सेंड होतो तेव्हा तो खालील प्रमाणे दिसतो. (इमेज ११)

(११)

जर तुम्ही ईमेल सेंड करताना "No SMS Passcode" ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर समोरच्या व्यक्तीला मेल दिसेल.  पण जर "SMS Passcode" ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर समोरच्या व्यक्तीला तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर एक पासवर्ड SMS येईल व तो टाकल्यानंतरच ईमेल ओपन होईल.  एक्सपायरी सेट केलेली असल्याने ठरलेल्या वेळेनंतर तुमचा मेल समोरच्याला ओपन होणार नाही.


६. स्मार्ट रिप्लाय:
जीमेलचा हा फिचर यापूर्वीच मोबाईल अँपमध्ये आला होता.  तुमचा मेल वाचून त्याच्या अनुषंगाने जीमेल स्वतः तुम्हाला रिप्लाय तयार करून देतो जेणेकरून तुम्हाला टाईप करण्याची गरज पडत नाही.  तुम्हाला फक्त तो रिप्लाय सिलेक्ट करून मेल सेंड करायचा असतो. (इमेज १२)

(१२)


जेव्हा कधी तुम्हाला पुन्हा तुमच्या जुन्या जीमेल वर जायचं असेल तेव्हा पुन्हा उजव्या बाजूला असणाऱ्या गियर आयकॉन वर क्लीक करून "Go Back To Classic Gmail" ऑप्शन तुम्ही केव्हाही सिलेक्ट करू शकता. (इमेज १३)
(१३)

!!! एन्जॉय टेकनॉलॉजी !!!

To read this article in English, Click Here.


धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
तुमचा तंत्रज्ञान मित्र
९२२१२५०६५६

#techiteasier #doyouknow #swarajyainfotech #jeevanrang #ileadmylife #gmailfeatures #newgmail #snoozegmail #secretemails #gmailtricks

Saturday, 21 April 2018

मोठा आजार? औषोधोपचारासाठी आर्थिक मदत हवीय?


आज माझ्या एका मित्राकडून मला एका नव्या पोर्टलबद्दल समजले.  त्याचा अडीज वर्षाचा पुतण्या एका आजाराने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि त्याला दहा लाखाची मदत  हवी आहे असा मेसेज मला त्याच्याकडून आला.  तेव्हा त्याने "Impact Guru" ला  रजिस्टर केलंय असं सांगितलं.  तिथून त्याला थोडीफार मदत उपलब्धही झाली होती.  मी जाऊन वेबसाईट पाहिली तेव्हा संकल्पना मलाही आवडली.   नेटवर पाहिलं तर इम्पॅक्ट गुरुला रिव्हिव्हसुद्धा चांगले होते.  भारतातली फंड रेजिंगसाठी एक नंबरच पोर्टल आहे असं बऱ्याच ठिकाणी नमूद केलं होतं 

जेव्हा आपल्या नजरेत असा कोणता पेशन्ट असेल ज्याला पैशाची खूप गरज आहे तुम्ही इथून पैशाची उभारणी करू शकता आणि इथे नाव नोंदणी करण्यासाठी पैशाची गरज नाही.  

यासाठी तुम्हाला फक्त खालील गोष्टी करायच्या आहेत. 

१.  तुमची परिस्थिती शाब्दिक, इमेज आणि व्हिडीओच्या फॉरमॅट मध्ये तिथे मांडायची असते.  यात तुम्ही हॉस्पिटलचे रिपोर्ट वैगेरे टाकलेत तर ते अजून पारदर्शकता जाणवून देतात.  कमीत कमी शब्दात प्रभावीपणे गोष्टी मांडल्या तर फरक पडतो. 

२. तुम्हाला किती पैशाची गरज आहे आणि किती दिवसात ते टाकायचं

३. तुमची ही माहिती त्या पोर्टलमधूनच सोशल मीडियावर शेअर करायची व तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही करायला लावायची.  

४. जे काही पैसे येतात त्यातले जवळपास ५% ही वेबसाईट कट करून घेते, काही टक्के पेमेंट ट्रान्सफरचे जातात  पण बाकीचे पैसे तुम्ही दिलेल्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात.  

यामध्ये  बाहेरच्या देशातून पैसे येण्याची सुद्धा सुविधा आहे.  कुणाला गरज असेल किंवा यापुढेही पडेल तुम्ही त्यांना https://www.impactguru.com ही वेबसाईट रेकमेंड करू शकता

मी स्वतः ही वेबसाईट अजून वापरलेली नाही पण येत्या काळात कुणाला याची गरजपडू शकते म्हणून माहिती शेअर केली आहे.  आजारपण कधीच सांगून येत नाही आणि पैशाचं सोंग आणता येत नाही. 


To Read this blog in English, Click here




धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री 
तुमचा तंत्रज्ञान मित्र

#techiteasier #swarajyainfotech #jeevanrang #ileadmylife #doyouknow

Wednesday, 11 April 2018

बिगबझार ऑफर स्कॅम


कालपासून एक लिंक  व्हाट्सअपवर मला दोघा-तिघांनी शेअर करून मिळाली.  यामध्ये बिगबझार त्याच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त ५००० चे व्हाउचर देत आहे असं दिलं होतं.  पहिल्यांदा बघताना ते डोमेनच नाव सुद्धा एकदम बिगबझारच डोमेन असावं असच  दिसत होत.  अशी ऑफर बघताना ती बऱ्यापैकी उत्सुकता चाळवणारी असते.  मी वेबवर डोमेनची रजिस्ट्रेशन  डेट पाहिली ती १० एप्रिल २०१८ म्हणजे कालचीच होती.  थोडा संशय आला.  मी त्या लिंकवर क्लिक करून पाहिलं.  समोर बिगबझार संबंधित एकानंतर एक ४ प्रश्न आले.  त्यांची उत्तरे दिल्यानंतर त्याने ते लिंक व्हाट्सअप च्या २० ग्रुप किंवा मित्रांना शेअर करायला सांगितलं .  अशावेळी फक्त ते  व्हाट्सअपच बटन क्लिक केलं तरी त्याचा काउंटर वाढत होता.  शेअर करण्याची गरज नव्हती.  जेव्हा आयफोनवरून  ट्राय केलं तेव्हा या लिंकनंतर मला पुढे ३-४ ऍप डाउनलोड करायला सांगितले.  यापुढे जाणं नेहमी धोकादायकच कारण असे  ऍप तुमच्या मोबाईलमध्ये वायरस आणू शकतात.  अँड्रॉइड वरून मुद्दाम पुन्हा ट्राय केलं तेव्हा त्या प्रश्नानंतर तो युट्युब व्हिडीओला घेऊन जात होता.  



एकंदरीत यातून ४ गोष्टी साधण्याचा हे समाजकंटक प्रयत्न करत असतात. 

१. ऍपचे डाउनलोड वाढावेत
२. ऍपच्या माध्यमातून मोबाईलमध्ये वायरस सोडावा 
३. लोकांचा वेळ यावर खर्च व्हावा
४. युट्युबचे व्हीव्ज वाढावेत

यावर मागे ऍमेझॉन ऑफरवर माझं एक आर्टिकल बरंच वायरल झाल होतं.   त्याची लिंक इथे पुन्हा शेअर करत आहे.  अशा ऑफर्सला बळी न पडता काय काळजी घेतली पाहिजे हे यातून कळेल. 



धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री 
तुमचा तंत्रज्ञान मित्र

#techiteasier #fakeoffers #swarajyainfotech #ileadmylife #jeevanrang #doyouknow

Monday, 12 March 2018

स्मार्टफोन अंडर १४?



रविवारी श्री कोचिंग इन्स्टिट्यूटच्या "जागो पालक" या उपक्रमात "सोशल मीडिया व मोबाईल" याविषयावर चर्चा झाली. आठवी नववीच्या मुलांना व त्यांच्या पालकांना तिथे आमंत्रित केलं होत. काही दिवसापूर्वीच संदीप दादाने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती कि "चौदा वर्षाखालील मुलामुलींना मोबाईल द्यावा कि नाही?" आणि त्यावर बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया त्याला कमेंटच्या स्वरूपात मिळाल्या होत्या.  जेव्हा त्याने मला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं आणि या विषयावर चर्चा होईल असं सांगितलं तेव्हा एका गंभीर आणि सध्याची गरज असणाऱ्या विषयावर चर्चा होईल याचा आनंद वाटला.  डॉ. सुशांत नागरेकर व मी मिळून  पालकांचे काही प्रश्न व त्याची दिलेली उत्तरे सारांशरूपात खालीलप्रमाणे आहेत. 

१. १४ वर्षाखालील मुलांना मोबाईल देणे योग्य आहे का?

- नाही.  आजच्या पालकांना मुलांबद्दल चिंता असेल तर तुम्ही स्मार्टफोन ऐवजी कीपॅड असणारे व त्यात कोणते फीचर्स नसणारे मोबाईल त्यांना घेऊन द्या.  मोबाईलचा वापर हा फक्त संपर्क सुरळीत व्हावा यासाठी होईल.  ते मोबाईलच्या आहारी जाणार नाहीत. 

- ज्या पालकांना भीती असते कि आमची मुले यामुळे मागे राहतील किंवा दुनिया तंत्रज्ञानाबरोबर जाईल व माझ्या मुलाला काही जमणार नाही अशा पालकांनी त्यांचा स्वतःचा स्मार्टफोन संध्याकाळी  ठराविक वेळ आपल्या मुलाला नव्या गोष्टी शिकण्यासाठी द्यावा.

- मुलांना स्मार्टफोन घेण्याऐवजी घरात एक कॉम्प्युटर (लॅपटॉप नाही) घ्यावा व त्याला इंटरनेट कनेक्शन जोडावे. तो कॉम्प्युटर असा ठेवावा कि जेणेकरून घरातल्या कोणत्याही जागेवरून सहज दिसेल.  यामुळे मुलं चुकीच्या गोष्टी करण्यास धजावणार नाहीत. 

- लहान मुलांनी शांत राहावे किंवा जास्त त्रास देऊ नये म्हणून पालक हल्ली लहान मुलांच्या हाती सहज मोबाईल देऊ करतात.  एक-दीड वर्षाचा मुलगा सहजरित्या मोबाईल हाताळतो ही अभिमान बाळगण्याची गोष्ट नसून काळजी करण्याची असू शकते.  या मुलांना लहानपणापासून गेम किंवा मोबाईल सतत पाहण्याची सवय लावली तर ती मुलं चिडचिडी किंवा हट्टी होऊ शकतात.  

- इंटरनेट आता बऱ्याच स्टेशन्सवर फ्री मध्ये उपलब्ध आहे किंवा विकत घेणेही तितकं महाग नाही.   अशावेळी हातात स्मार्टफोन असताना वाढत्या वयात असणाऱ्या मुलांचा कल सहसा ब्लु फिल्म्स बघण्याकडे किंवा विघातक गोष्टी बघण्याकडे जास्त असतो.  

पालकांनी गोष्टी सहज उपलब्ध करून देऊन स्वतःची जबाबदारी झटकणं चुकीचं आहे.  आपल्या पाल्याची प्रायव्हसी ब्रेक न करता तो/ती काय करतेय यावर लक्ष असणं महत्वाचं. 


२. सततच्या मोबाईल वापराने आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात?

- तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक आर्टिकल आल होतं त्यात काही धक्कयादायक माहिती होती. सतत तंत्रज्ञानाचा वापर करून जे मानसिक रोग उदभवले आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचा राज्य म्हणून पूर्ण भारतात दुसरा नंबर लागतो.  जवळजवळ सव्वा लाख लोक सध्या मानसोपचारतज्ज्ञाकडे यासाठी उपचार घेत आहेत.  मुंबईचा पूर्ण भारतात शहर म्हणून पहिला नंबर लागतो. 

- अवेळी भूक लागणे किंवा भूक मरणे, निद्रानाश, चिडचिड होणे अशा प्रकारचे त्रासही जाणवू शकतात.  

- मेंटल हेल्थ सेंटरने एक सर्वे केला होता ज्यात त्यांनी सांगितलं होत कि एक व्यक्ती दिवसभरात ११२ वेळा मोबाईल चेक करते.  याला "ब्रोकन फोकस सिंड्रोम" असे म्हणतात.  याचा अर्थ माणसाची एकाग्रता कमी होत चालली आहे. 

- सतत मोबाईल चाळल्याने (सहसा तो रात्री काळोखात झोपताना चाळला जातो) डोळ्यांवर परिणाम होतो.  


३. सोशल मीडियाचा नकारात्मक काय प्रभाव होतो?

- सोशल मीडियाचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही करोडो लोकांपर्यंत सहज पोहचता.  पण त्यात तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये असणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या ओळखीची आहे का?  हे आपण पाहायला हवं. 

- समोरच्या व्यक्तीचा पडताळा करणे सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज शक्य नाही त्यामुळे समोरच्या व्यक्तीने टाकलेल्या फोटोजवरून  त्या व्यक्तीची विश्वासार्हता ठरवू नका.  त्या व्यक्तीवर चटकन विश्वास ठेवू नका.  अशीच बरीचशी प्रेम प्रकरण तयार होऊन कित्येक आत्महत्येच्या व खुनाच्या केसेस दाखल केल्या आहेत.   

- आपली प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर यायला पाहिजे हा अट्टाहास नको.  तुम्ही सध्या काय करता याचा अंदाज बांधणे किंवा तुमचे सगळे लोकेशन्स ट्रॅक करणे सहज शक्य आहे.  

- महिलांच्या / मुलींच्या फोटोजच  क्लोनिंग करून त्याचा दुरुपयोग करण्याच्या बऱ्याच केसेस यापूर्वी रजिस्टर झाल्या आहेत.  बऱ्याच वेळेला सायबर बुलिंग (ऑनलाईन रॅगिंग) करून समोरच्या व्यक्तीचा मानसिक छळ करणे हा प्रकार वाढत आहे. 

- लहान मुलांचे फोटोज नग्न अवस्थेत टाकणे, किंवा त्यांच्या फोटोजची अतिशयोक्ती करणे हेसुद्धा त्या मुलांसाठी घातक ठरू शकते.  हल्ली चाईल्ड पोर्नोग्राफी हा प्रकार सुद्धा खूप वाढायला लागला आहे. 

- इंटरनेटवर टाकलेली कोणतीही गोष्ट धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखी आहे.  तुम्ही ती एकदा पोस्ट केली मग ती डिलीट करूनही ती पूर्णपणे  निघून जात असेल याबाबतीत शंकाच आहे.  तेव्हा कोणतीही गोष्ट पोस्ट करण्याअगोदर ती टाकणे खरोखर गरजेचे आहे का हा प्रश्न स्वतःला नक्कीच विचारा.  


४. मुलांनी या गोष्टीचा सकारात्मक वापर करावा यासाठी केलं पाहिजे ?

- मुलांनी समजूतदार झाल्यावर मतदान करावं यासाठी जशी आपल्याकडे मतदान करण्यासाठी वयाची अट आहे तसेच स्वतःचा मोबाईल वापरायला देण्यासाठीसुद्धा एक वयाची अट असायला हवी.  तोपर्यंत मुलांनी शिकावं यासाठी पालक स्वतःचा मोबाईल मुलांना ठराविक वेळ ठरवून देऊ शकतात.  

- पालकांनी मुलांना हव्या त्या गोष्टी देऊन आपली जबाबदारी पूर्ण झाली असं न समजता मुलांच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायला हवं.  एका सर्वेक्षणात अस समोर आलं आहे की मुले / मुली आपले प्रॉब्लेम्स फेसबुकवरच्या अनोळखी व्यक्तीबरोबर शेअर करण्याला प्राधान्य देतात.  त्या गोष्टी पालकांशी शेअर करणे त्यांना योग्य वाटत नाही किंवा ते त्यासाठी कम्फर्टेबल नसतात.  यासाठी पालकांनी  त्यांच्याशी प्रत्येक वेळी मोकळा संवाद साधायला हवा.  घरातल्या छोट्या मोठ्या डिस्कशनमध्ये मुलांना सहभागी करून घ्यावं जेणेकरून आपण घरातले महत्वाचे घटक आहोत हे मुलांना जाणवायला हवं.  पालकांना कोणतीही गोष्ट सांगताना मुलांनी कचरता कामा नये एवढा विश्वास पालकांनी मुलांना द्यावा.  मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याकडे पालकांचा कल असावा.  

- सोशल मीडियावर मित्र  / मैत्रीण ऍड करताना सहसा तो ओळखीचा असेल असाच मित्र / मैत्रीण ऍड करायला हवेत.  अनोळखी व्यक्तींना फ्रेंडलिस्ट मध्ये ठेवू नये.   

शेवटी तंत्रज्ञान ही फक्त एक युटिलिटी आहे.  त्याच्या वापर कसा करावा हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे.  जस चाकूने भाजी कापता येते व त्याने खुनही होतो तसंच तंत्रज्ञानाचही आहे.  आपण त्याचा जसा वापर करू तसा त्याचा प्रभाव आहे.  सोशल मीडिया वाईट आहे असं नाही पण त्याचा साकारात्ममक वापर कसा करावा याची माहिती असणे गरजेचे आहे जेणेकरून त्याच व्यसनात रूपांतर होणार नाही.  

For English Information, Click here
http://techiteasierenglish.blogspot.in/2017/10/Whatsapp-Undo-Send.html

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
तुमचा तंत्रज्ञान मित्र
9221250656

#techiteasier #doyouknow #swarajyainfotech #ileadmylife #jeevanrang

Monday, 5 February 2018

फेसबुक आणि लहान मुलं



"क्युटनेस ओव्हरलोडेड" कॅप्शनने एक-दीड वर्षाच्या मुलीचा नग्न फोटो मी माझ्या फेसबुक न्यूजफीडवर पाहिला आणि दोन मिनिट स्तब्ध झालो.  तसं खरं म्हणजे त्यात वेगळं वाटण्यासारखं काही नव्हतं.  कारण अशी चिल्लीपिल्ली गॅंग बिनधास्त अशा अवस्थेत घरात फिरत असते आणि सगळ्यांना कौतुकच वाटत असतं.  पण म्हणून त्या निरागसतेला असं सोशल मीडियावर पोस्ट करणं कितपत योग्य याचा विचार मी करत होतो.  

हल्ली फेसबुकवर "येथे काहीतरी टाका" हा मेसेज लोकांनी खूपच सिरियसली घेतलाय आणि ते त्यावर केव्हाही काहीहि पोस्ट करत असतात आणि त्यात लहान मुलांचे फोटो मी खूप वेळा पाहिलेले आहेत.  याबाबतीत मी नेटवर माहिती शोधत होतो तेव्हा सापडलं कि लहान बाळाचं वय ५ वर्ष होईपर्यंत त्याच्या आईबाबांनी त्याचे अंदाजे १५०० फोटो सोशल साईट्सवर अपलोड केलेले असतात आणि त्यामध्ये फेसबुक हे खूप पुढे आहे आणि त्यानंतर आता इंस्टाग्राम आहेच.  खरं तर फेसबुक हे आपले विचार किंवा आपली पर्सनल, प्रोफेशनल माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचे अत्यंत उपयुक्त  माध्यम आहे.  माझ्या बाळाची वाढ कशी होतेय हे मला माझ्या दूरवर असणाऱ्या नातेवाईकांपर्यंत किंवा मित्रांपर्यंत पोहचवायला नेहमीच आवडतं पण त्यासाठी हे आपल्या जवळचे सोडून सगळ्यांसाठीच खुलं असणारं माध्यम ठीक आहे का?  हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. 

असा एक फोटो बघून मी एकदा माझ्या मित्राला सूचित केलं होतं, तेव्हा त्याचं अपेक्षित उत्तर मला आलं कि "मी माझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये असणाऱ्या मित्रांनाच हे सगळं दिसेल अशी सेटिंग केली आहे".  तो मित्र बऱ्यापैकी टेक्नोसॅव्ही आहे.  हि सेटिंग केल्याने फेसबुक आपल्या मित्रांनाच ती माहिती दाखवेल हि नक्कीच खात्री असते पण तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये असणारे खरोखरच तुमचे सगळे मित्र आहेत का?  प्रत्येकाला व्हेरिफाय करून तुम्ही त्यांना ऍड केलंत का? हे प्रश्न येतातच.  शिवाय सोशल नेटवर्कचा एक अलिखित नियम आपल्या सर्वाना माहित नसतो किंवा आपण सोयीस्कररीत्या विसरतो कि, तुम्ही एखादी पोस्ट ऑनलाईन टाकलीत तर तुमच्या कितीही प्रायव्हसी सेटिंग असतील तरी ती पुढे कशी जाईल हे तुमच्या हातात नसतं.  म्हणजेच धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखंच.  आणि शिवाय तुम्ही अपलोड केलेली प्रत्येक गोष्ट फेसबुक त्याच्या इंटरेस्टसाठी वापरु शकतो हि परवानगी त्याने टर्म्स मधून तुमच्याकडून घेतलेलीच असते.  खरं म्हणायला आता फेसबुक आणि गुगल तुम्हा स्वतःपेक्षा तुम्हाला जास्त ओळखतो.  यावर मी एखाद्या आर्टिकल मधून बोलेनच.  

कुणाचेही फोटो वापरण्यासाठी किंवा अपलोड करण्यासाठी त्यां व्यक्तीची परवानगी असणे गरजेचे असते.  पण आपली मुले लहान असल्याने आणि मातृपितृत्वाच्या भूमिकेत आपण असल्याने कौतुकापोटी हे सगळं करून बसतो. फ्रांससारख्या देशामध्ये हा प्रकार गुन्ह्यामध्ये मोडतो व त्यासाठी खूप मोठा आर्थिक भुर्दंडहि भरावा लागतो.   

सोशल मीडियावर लहान मुलांसंदर्भात काहीही अपलोड करण्यापूर्वी खालील गोष्टींचा विचार नक्कीच करा 

१. ही माहिती नक्की अपलोड करणं गरजेचं आहे का?  जर खरोखर जवळच्या नातेवाईकांना ती माहिती द्यायची असेल तर ईमेल का करू नये?

२. आपल्या नकळत आपले बरेच स्मार्टफोन, फोटोबरोबर फोटो काढलेल्या जागेची माहिती त्या इमेजमध्ये साठवत असतात.  असे फोटो शेअर करताना आपण पोर्टलवर आपल्या खाजगी लोकेशन्सची माहिती शेअर करतोय तेव्हा ते नक्की गरजेचं आणि सुरक्षित आहे का?

३. सध्या चाईल्ड पोर्नोग्राफी हा प्रकार अत्यंत  भयंकररीत्या वाढतो आहे.  माझ्या फोटोने मी त्या गोष्टीला निमंत्रण देतोय का?

४. मी आज जर ही माहिती  अपलोड करतोय आणि जेव्हा माझ्या मुलाला / मुलीला समज येईल तेव्हा तो / ती ते बघून आनंदीत होईल की त्याला / तिला अपमानास्पद वाटेल?  त्या माहितीचा त्याला पुढे काही त्रास होईल का?

मी माझ्या अगोदरच्या काही आर्टिकल्समधून यासारख्याच काही गोष्टींवर प्रकाश टाकण्याचं काम केलं आहे.  एकादोघांनी मला याबाबतीत प्रश्न विचारला होता म्हणून हे आर्टिकल लिहिणं मला गरजेचं वाटलं.  जे हे सगळं मी मांडलंय तसं होईल असं नाही आणि होणारही नाही असंही नाही.  त्यामुळे सोशल मीडियाचा कसा वापर करावा हा सर्वस्वी तुमचा चॉईस आहे. फक्त त्याआधी तुमच्यासारख्या माझ्या जवळच्या व्यक्तींना त्यातले खाचखळगे माहित असावेत म्हणून हा सगळा खटाटोप.


धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री 
तुमचा तंत्रज्ञान मित्र
9221250656

#techiteasier #doyouknow #swarajyainfotech #ileadmylife #jeevanrang

Friday, 26 January 2018

व्हाटसप फॉर बिजनेस


व्हाट्सअपने संवादाची व्याख्या गेल्या काही वर्षात अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्ष संवाद अशी केली आहे.  तसे आपण सगळे व्यवसायातही व्हाट्सअपचा वापर आपल्या पद्धतीने करत होतोच मग हे वेगळं काय अँप्लिकेशन व्हाट्सअपला करावस वाटलं हा प्रश्न होता  म्हणून मी स्वतः ते अँप्लिकेशन इन्स्टॉल करून पाहिलं.  खरं म्हणायला व्हाट्सअप फॉर बिजनेस आणि व्हाट्सअपमध्ये खूप असा काही फरक नाही पण काही फीचर्स त्यांनी या अँप्लिकेशनमध्ये दिलेत त्याचा छोट्या उद्योगधंद्यांना खूप फायदा होऊ शकेल.  जसं आपण काही कम्पनीच्या वेबसाईटवर गेल्यावर त्यांचं डेडिकेटेड चॅट मेसेंजर असायचं तसंच आपण हा चॅट अँप्लिकेशन डेडिकेटेड आपल्या व्यवसायाच्या सपोर्टसाठी वापरू शकतो.

नवीन काय?
१. तुम्ही तुमच्या बिजनेसची प्रोफाइल यामध्ये अपडेट करु शकता जेणेकरून तुमच्याशी चॅट करणारा व्यक्ती तुमची प्रोफाइल (व्यवसायाची माहिती) सहज पाहू शकेल 

२. काही मेसेजेसचे डिफॉल्ट फॉरमॅट तुम्ही यात सेट करू शकता.  जस कि, ऑनलाईन नसताना समोरच्या व्यक्तीला ऑटोमॅटिक रिस्पॉन्स पाठवणे

३. युजर ला मेसेज पाठवण्यासाठी काही डिफॉल्ट फॉरमॅट सेट करून ठेवणे.  जस कि, Thank You मेसेज. 

या वरील सर्व गोष्टी सविस्तर पाहूया.


इन्स्टॉलेशन
१. गूगल प्लेस्टोरवर जाऊन Whatsapp Business सर्च करा व इन्स्टॉल करा 



२. इन्स्टॉल झाल्यानंतर तो तुम्हाला पहिली टर्म्स अँड कंडिशनची स्क्रिन दाखवेल त्यावर Agree And Continue क्लिक करा 


३. अँड्रॉइडमध्ये बाकी अँप्लिकेशनसाठी जशा परमिशन लागतात तशा यालाही द्याव्या लागतील.  "Allow" बटन क्लिक करत पुढे जा.









४. तुमच्या व्यवसायाचा मोबाईल नम्बर टाका.  हा नम्बर जर तुम्ही रेग्युलर व्हाट्सअपसाठी वापरत असाल तर तोच नम्बर तुम्ही इकडे  रजिस्टर करू शकत नाही.  तुमच्याकडे वेगळा नंबरच असावा लागतो.  जर तुमचं ड्युअल सिम असेल तर वेगवेगळ्या नम्बर ने एकाच मोबाईलवर तुम्ही दोन्ही व्हाट्सअप युज करू शकाल पण जर नसेल तर तुम्हाला वेगळा मोबाईल व नंबर युज करावा लागेल.



५. नम्बर टाकल्यावर नेक्स्ट बटन क्लिक करा.  कन्फर्मेशन मेसेज ला ओके क्लीक करा.



६. तो पुन्हा एकदा एस एम एस रीड करण्याची परमिशन मागेल.  त्याला Allow क्लीक करा.  त्यानंतर तो OTP वेरीफिकेशन करून  आपोआप पुढे जाईल. 


७. पुढच्या स्क्रीनवर तो तुम्हाला तुमच्या बिजनेसचे नाव विचारेल.  हे नाव व्यवस्थित चेक करून टाका कारण हे पुन्हा बदलता येत नाही.  तुम्ही इथे प्रोफाईल पिक्चर म्हणून तुमचा लोगो सुद्धा ठेवू शकता. 


    


६. सेटअप करताना तो तुम्हाला तुमच्या बिजनेसच नाव, बिजनेस टाईप, लोकेशन, डिस्क्रिप्शन, इमेल व वेबसाईट विचारेल.  हि माहिती भरून पुढे जा 


या स्टेप्स ने तुमचं इन्स्टॉलेशन पूर्ण होईल 


नवे फीचर्स :

१. अवे मेसेज (Away Message)

जेव्हा तुम्ही ऑफलाईन असता तेव्हा जर तुम्हाला समोरच्याने मेसेज पाठवला तर त्याला काही ना काही रिप्लाय आपोआप जावा म्हणून हा फिचर देण्यात आला आहे.  यासाठी तुम्हाला व्हाट्सअप बिजनेसच्या उजव्या बाजूला असणार्या ३ डॉटस वर क्लिक करून त्यात सेटिंगवर क्लिक कराव लागेल व त्यात बिजनेस सेटिंगवर क्लिक करा




बिजनेस सेटिंगच्या पेजवर Away Message चा ऑप्शन असेल तो क्लिक करा.


Send Away Message ऑप्शन ऑन करा.  इथे आधीपासूनच एक मेसेज सेट केलेला असतो.  तुम्ही त्याच्या बाजूला असणार्या पेन्सिल बटन वर क्लिक करून तो चेंज करू शकता.  मेसेज सेट झाल्यावर तुम्ही उजव्या बाजूला वर असणारं Save बटन क्लिक करा. 






२. ग्रीटिंग मेसेज (Greeting Message) 

एखाद्या कस्टमरने आपल्याला पहिल्यांदा मेसेज केला किवा १४ दिवसाच्या अंतराने मेसेज केला तर त्याच्या मेसेजला आपोआप रिप्लायने आपला एक मेसेज जावा यासाठी ग्रीटिंग मेसेजची सुविधा देण्यात आली आहे.  यासाठी तुम्हालावर दिलेल्या स्टेप्स प्रमाणे सेटिंग -> बिजनेस सेटिंग -> ग्रीटिंग मेसेज मध्ये जायचं आहे. 

 


Send Greeting Message ऑप्शन ऑन करा.  इथेसुद्धा आधीपासूनच एक मेसेज सेट केलेला असतो.  तुम्ही त्याच्या बाजूला असणार्या पेन्सिल बटन वर क्लिक करून तो चेंज करू शकता.  मेसेज सेट झाल्यावर तुम्ही उजव्या बाजूला वर असणारं Save बटन क्लिक करा. 



२. क्विक रिप्लाय (Quick Replies) 

बर्याच वेळेला आपल्या काही मेसेजचा टेक्स्ट हा बर्यापैकी सेम असतो आणि ते मेसेजेस आपल्याला पुन्हा पुन्हा टाईप करावे लागतात.  अशावेळी हे मेसेज आधीच कुठेतरी सेट करून जर ते सोप्या पद्धतीने लागतील तेव्हा वापरता आले असते तर काम सोप झालं असत अस वाटायचं आणि नेमक तेच या फीचरने केल.  यासाठी तुम्हाला वर दिलेल्या स्टेप्स प्रमाणे सेटिंग -> बिजनेस सेटिंग -> क्विक रिप्लाइज मध्ये जायचं आहे. 





क़्विक रिप्लायमध्ये Thanks  फॉरमॅट साठी एक रिप्लाय आधीच असेल.  तुम्ही तो हव तर चेंज करू शकता,  नवीन रिप्लाय  ऍड करण्यासाठी खाली एक + च चिन्ह असेल त्यावर क्लिक करा.   तुमचा मेसेज व त्याचा शॉर्टकट सेट केल्यावर तुम्हाला वर उजव्या बाजूला असणार Save बटन क्लिक करावं लागेल.  तुमचा हा नवीन फॉरमॅट  क़्विक रिप्लायच्या लिस्ट मध्ये दिसेल. 




जेव्हा तुमचा ग्राहक तुमची प्रोफाइल चेक करतो तेव्हा त्याला तुम्ही टाकलेली सगळी माहिती त्या प्रोफाइलमध्ये दिसते.



हे अँप्लिकेशन नुकतंच लाँच झालं असल्याने त्यात खूप सारे फीचर्स नाहीत.  पण काही दिवसात यात खूप नवीन गोष्टी पाहायला मिळतील हे नक्की. 

!!! एन्जॉय टेक्नॉलॉजी !!!


For English Information, Click here
http://techiteasierenglish.blogspot.com/2018/01/whatsappbusiness.html


धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री 
तुमचा तंत्रज्ञान मित्र
9221250656

#techiteasier #doyouknow #swarajyainfotech #ileadmylife #jeevanrang

Friday, 5 January 2018

फेसबुक बर्थडे रिमाइंडर मोबाईलवर

फेसबुक हे जगाशी जोडण्यासाठी एक उत्तम माध्यम आहे.  काही लोक त्याचा व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा वापर करतात.  फेसबुकमधील सगळ्यात उत्तम ऑप्शन म्हणजे बर्थडे रिमाइंडर.  पण जर तुम्ही रेग्युलर फेसबुक युजर नसाल तर तुम्हाला त्या त्या वेळेचे बर्थडे रिमांडर मिळत नाहीत.  याचसाठी एक उत्तम ऑप्शन आहे तुमच्या मोबाईलमधील गुगल कॅलेंडरला फेसबुकशी कनेकट करायच.  कसं करायचं ते आता पाहूया. 

१. तुमच्या कॉम्प्युटरवरून फेसबुक ला लॉगिन करा

२. तुमच्या टाईमलाईनच्या डाव्या बाजूला इव्हेंट्स (Events) नावाचं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. 

३. इव्हेंट्स पेज मध्ये उजव्या बाजूला खाली "You can add events to Google Calendar" असा ऑप्शन दिसेल.  त्यामध्ये २ पर्याय असतील.  
- पुढे येणारे इव्हेंट्स  (Upcoming Events)
- वाढदिवस (Birthdays)



४. बर्थडेवर राईट क्लीक करून कॉपी लिंक ऍड्रेस (Copy Link Address) ऑप्शन क्लिक करा


५. जो जीमेल अकाऊंट तुमच्या मोबाईलमध्ये कॉन्फीगर आहे त्या जीमेल अकाउंटने लॅपटॉपवर लॉगिन करा. 

६. उजव्या बाजूला वर ९ डॉट्स दिसतील त्यावर क्लिक करून कॅलेंडर (Calendar) हे ऑप्शन निवडा. 

७. डाव्या बाजूला ऍड या फ्रेंड्स कॅलेंडर (Add a Friends कॅलेंडर) ऑप्शनच्या बाजूला असणाऱ्या + बटणवर क्लीक करा.  त्यात फ्रॉम यु आर एल (From URL) सिलेकट करा. 


८.  येणाऱ्या बॉक्समध्ये राईट क्लिक करून पेस्ट करा.  


९. खाली एक चेकबॉक्स येईल.  मेक खास कॅलेंडर पब्लिकली ऍक्सेसिबल (Make this Calendar Publicly Accessible).  तो चेक करू नका 

१०.  ऍड कॅलेंडर (Add Calendar) बटन क्लीक करा.  

११. तुम्हाला डावीकडे कॅलेंडर ऍड झालेलं दिसेल व बर्थडे  तुमच्या कॅलेंडरमध्ये आलेले दिसतील 




१२. मोबाईल मध्ये कॅलेंडर ओपन करा.  उजव्या बाजूला ३ डॉट्स असतील त्यावर क्लीक करून सेटीन्ग्स मध्ये जा.  तुमच्या अकाउंटवर क्लिक करून तुमचा नवीन कॅलेंडर सिलेक्ट करा





!!! एन्जॉय टेक्नॉलॉजी !!!


For English Information, Click here
http://techiteasierenglish.blogspot.in/2018/01/mobilebirthdayreminder.html


धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री 
तुमचा तंत्रज्ञान मित्र
9221250656

#techiteasier #doyouknow #swarajyainfotech #ileadmylife #jeevanrang