फोलोवर्स

Tuesday, 21 November 2017

आता पासवर्ड विसरणे अवघड !!!


  
आपल्या सर्वाना एक नेहमी भेडसावणारी समस्या म्हणजे आपण इंटरनेट वर कुठेही रजिस्टर करू तिथे जर आपण सतत लॉगिन करत नसू तर आपण पासवर्ड विसरतो.  अशावेळी  सगळीकडे सेम पासवर्ड ठेवण्याकडे किंवा पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवण्याकडे आपला कल असतो.  पण गरजेच्या नसणाऱ्या आणि तात्पुरत्या वापरल्या गेलेल्या साईट्सवर सुद्धा सेम पासवर्ड आल्याने काही प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो.  

आपले महत्वाचे व सेक्युअर अकाऊंट्स :
१. बँक अकाऊंट्स (लॉगिन आणि ट्रँजॅक्शन पासवर्ड)
२. पर्सनल (फक्त स्वतःला ऍक्सेस असणारे) ईमेल अकॉउंट 
३. सोशल नेट्वर्किंग अकाऊंट्स  

इतर अकाऊंट्स :
१. पर्सनल  (इतरांना ऍक्सेस असणारे) ईमेल अकॉउंट 
२. अशा बऱ्याच वेबसाईट जिथे कन्टेन्ट पाहण्यासाठी टेम्पररी लॉगिन करावं लागत 

या सगळ्या अकाउंट्सना आपण सेम पासवर्ड ठेवतो आणि त्यामुळे सेन्सिटिव्ह माहितीला धोका राहू शकतो.  सगळे पासवर्ड वेगळे पण सहज लक्षात राहतील अशी ट्रिक आता आपण बघू 

सहसा पासवर्ड जर स्ट्रॉन्ग हवा असेल तर त्याला ३ गोष्टी लागतात 
१. लेटर्स (स्मॉल आणि कॅपिटल)
२. एखादं  स्पेशल कॅरॅक्टर 
३. नंबर्स 

या सगळ्यांच मिळून एक कॉम्बिनेशन बानू शकत.  समजा तुम्ही याहूचा पासवर्ड ठेवत आहात.  तर त्याचा फॉरमॅट असा असेल  
{xyz}{@}{Yahoo}{नंबर}

{xyz}
इथे तुम्ही असं काहीतरी नाव निवडा ज्या गोष्टीचा तुमच्या आयुष्याशी काही संबंध नाही.  आपल्या घरातल्यांची किंवा नातेवाईक यांची नाव निवडायची नाहीत. 

{@}  
इथे आपण एखाद स्पेशल कॅरॅक्टर घ्यायचं.  म्हणजे @ किंवा डॉट किंवा # साइन.  क्वेश्चन मार्क  बऱ्याच ठिकाणी अँक्सेप्ट  करत नाही त्यामुळे तो ना घेणे उत्तम 

{Yahoo} 
ज्या पोर्टल साठी आपण लॉगिन करतोय त्याचा नाव.  म्हणजे याहूसाठी Yahoo.  फेसबुकसाठी fb किंवा फेसबुक असं. 

{नंबर}
इथे तुम्ही तुमच्या आयुष्यातलं एखाद महत्वाचं वर्ष घेऊ शकता किंवा एखादा कोणताही ४ ते सहा अंकी नंबर.  इथे तुमचं किंवा तुमच्या मुलाचं जन्मवर्ष, लग्नाचं वर्ष असं लोकांना माहित असलेलं वर्ष घेऊ नका. 

म्हणजे थोडक्यात फॉरमॅट असा बनेल 
sundaram#Yahoo2906 किंवा sundaram#YAHOO2906

कोणते लेटर कॅपिटल किंवा स्मॉल ठेवायचे हे ठरवून घ्या. हा फॉरमॅट तुम्ही तुमचा स्वतःही ठरवू शकता.  आता या फॉरमॅटमुळे होणारे निरनिराळे पासवर्ड असे असतील 

जीमेलसाठी : sundaram#Gmail2906
ICICI बँकेसाठी : sundaram#Icici2906
HDFC बँकेसाठी : sundaram#Hdfc2906
फेसबुकसाठी : sundaram#Facebook2906
ट्विटरसाठी : sundaram#Twitter2906 

जे आपले इतर अकाउंट्स असतात व सेक्युअर नसतात तिथे सगळीकडे एकच पासवर्ड ठेवायचा जेणेकरून तुम्ही जेव्हाही अशा ठिकाणी लॉगिन कराल तेव्हा तुम्हाला पासवर्ड आठवण्याची गरज भासणार नाही.  

बँकेत लॉगिन आणि ट्रँजॅक्शन पासवर्ड सेम ठेवू शकत नाही. अशावेळी लॉगिन पासवर्ड जर sundaram#Icici2906 असेल तर ट्रँजॅक्शन पासवर्ड SUNDARAM#iCICI2906 असा होईल.  म्हणजे फक्त कॅपिटल आणि स्मॉल लेटर्सचा फरक. 

मी बरेच वर्ष हि टेक्निक वापरतो आहे.  पासवर्ड हि वेगळे आणि लक्षात ठेवण्यासहि सोपे.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री 
तुमचा तंत्रज्ञान मित्र
9221250656

#techiteasier #doyouknow #swarajyainfotech #ileadmylife #jeevanrang