टेक आय टी इजीअर
Sunday, 9 November 2025
फेसबुक अकाउंट क्लोन
Wednesday, 22 March 2023
"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮
"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!"
"If you are not paying for the product, then you are the product."
नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या. याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे हायलाईट झालं.
"मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो. यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील". काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही. हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे.
"त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे". ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डेटा ॲनालिसिस व कॅम्पेनिंग करणाऱ्या कंपनीने डोनाल्ड ट्रम्पसाठी काम केलं होत. फेसबुक थर्ड पार्टी ॲप्सना ॲक्सेस देतं याचा फायदा घेऊन या कंपनीने एक ॲप डेव्हलप केलं ज्यात युजरच्या पर्सनालिटी टेस्टचा सर्वे घेतला जायचा. यासाठी युजरला ५ डॉलर्सपर्यंत पैसे सुद्धा मिळायचे. यामध्ये फक्त एक अट होती की युजर्सना "Login with Facebook" करावं लागायचं. यामध्ये युजरच्या प्रोफाईलचा ॲक्सेस केंब्रिज ॲनालिटीकाला मिळत होता. यापद्धतीने त्यांना जवळपास २ लाख ७० हजार लोकांच्या फेसबुक प्रोफाईलचा डेटा मिळाला. त्यासोबतच या लोकांच्या फ्रेंड्सच्या प्रोफाईलचा ॲक्सेस मिळून तो आकडा जवळपास ८ करोड ७० लाख अमेरिकन नागरिकांपर्यंत पोहचला. एका व्यक्तीचे किमान ५००० डेटापॉइंट्स त्यांना मिळाले आणि डेटा ॲनालिसिसच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक व्यक्तीची प्रोफाईल स्टडी केली. त्यातून प्रत्येक व्यक्तीची पर्सनालिटी कशी असेल याचा अंदाज बांधला गेला. हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजंसच्या माध्यमातून आपोआप होत गेलं. व्यक्ती स्वतःला किती ओळखतो यापेक्षा ती सिस्टम त्या व्यक्तीला जास्त ओळखायला लागली. ट्रम्पच्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल काही नकारात्मक कंटेंट तयार करण्यात आले व अमेरिकन नागरिकांना त्यांच्या मुडनुसार ते कंटेंट दाखवण्यात आले. यातसुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजंस अत्यंत हुशारीने काम करतो. यानंतर एका अमेरिकन पत्रकार कॅरोल कॅडवालडर हिने या गोष्टीवर फोकस आणला आणि अभ्यासात केंब्रिज ॲनालिटीकामध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून काम करण्याऱ्या क्रिस्तोफर वायली याच्याशी संपर्क साधला. यामुळेच पुढे सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या. शेवटी हे प्रकरण बराच वेळ चाललं आणि "यापुढच्या निवडणुका प्रामाणिक पद्धतीने होऊ शकतात का ?" असा प्रश्न उपस्थित झाला. जेव्हा विधान शाखेमध्ये (अमेरिकेत ज्याला काँग्रेस म्हणतात) मार्क झुकेरबर्ग (फेसबुकचा जनक) याला याबाबतीत प्रश्न विचारले गेले तेव्हा त्याला बऱ्याच गोष्टींची उत्तर देता आली नाहीत.
२०१४ च्या इलेक्शनबाबत स्वाती चतुर्वेदी यांचं "आय ॲम अ ट्रोल" हे पुस्तक सुद्धा काही अंशी या गोष्टीवर प्रकाश टाकतं. सध्या आपण वापरत असलेले सोशल मीडिया ॲप (इतरही फ्री ॲप असू शकतात) तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक करत आहेत. मुळात तुम्ही जे बोलता (कोणत्याही भाषेत) तेसुध्दा हल्ली ट्रॅक होते आहे आणि याची बरीच उदाहरणे आहेत. यात तुमचा डेटा सरळ कोणत्या कंपनीला विकला जात नसेल तरी तुमच्या वैयक्तिक व्यक्तिमत्वाचा पूर्ण अभ्यास या ॲपचा आहे. तुमच्या प्रत्येक वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याबद्दलची तंतोतंत माहिती या कंपन्यांकडे आहे. आणि या माहितीच्या आधारे तुम्हाला इन्फॉर्मेशन दाखवली जातेय. जर हे थांबवायचं असेल तर साधा की पॅड वाला फोन वापरावा लागेल जे सध्याच्या घडीला बऱ्याच जणांसाठी कठीण आहे. त्यामुळे जे तुम्हाला दिसतंय किंवा दाखवलं जातय ती प्रत्येक गोष्ट खरी असेल असं खात्रीलायक मानू नका. कारण आपल्याला तेच खरं वाटतंय जे आपल्याला दाखवलं जातंय.
तूर्तास एवढंच!
धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
Thursday, 22 October 2020
व्हाईट हॅट गड़बड़ और कन्फ्युज पेरेंट्स
पिछले कुछ दिनो से यह ऍड टीवी या सोशल मीडिया पर बहोत ज्यादा चल रहा है और कई पेरेंट्स को कन्फ्युज कर रहा है। मेरे कई दोस्त या पेरेंट्स मुझे फोन करके पूछते हैं कि क्या मैं मेरे बच्चे को इसमे शामिल कर लू? कई लोग यह भी सोचते हैं कि यह सिर्फ एक मार्केटिंग गिमिक है। मैंने सोशल मीडिया पर कई नकारात्मक रिव्हिव्ह इसके बारे मे पढे है। बदलाव लोगो को अच्छा नहीं लगता और लोग उसका शुरुवात में विरोध करते ही है। भले ही कुछ माता-पिता इस बात को स्वीकार करते हैं, लेकिन उनका उत्साह अलग महसूस होता है। कुछ माता-पिता इसे पैसे कमाने का साधन मानते हैं, कुछ इसे अनिवार्य मानते हैं, जबकि कुछ स्टेट्स सिम्बॉल कि तरह कोर्स पूरा करने के बाद सोशल मीडिया पर सर्टिफिकेट अपलोड करते हैं। यह पूरा प्रकार भारत में हमारे कई पेरेंट्स के लिए नया है, इसलिए इस नए विज्ञापन ने काफी सारे पेरेंट्स को अलग ही फिलिंग दि है। लेकिन इस विज्ञापन में कितना भी अतिशयोक्ति क्यों न हो, भविष्य में इस पद्धति की शिक्षाओं की आवश्यकता होगी।
व्हाईट हॅट गोंधळ आणि गोंधळातले पालक
"हे सगळे कोण आहेत?"
Wednesday, 7 August 2019
संशय घ्यायला शिका !
संशय घ्यायला शिका !
तुमच्या बँकेचं एटीएम कार्ड ब्लॉक झालंय. पुन्हा चालू करण्यासाठी अकाउंट नंबर द्या", असं म्हणत तुमची ओटीपी किंवा इतर सिक्रेट माहिती समोरचा व्यक्ती फोनवर विचारू लागला तर संशय घ्यायला शिका. असे खोटे कॉल करून बऱ्याच व्यक्तींच्या बँक अकाउंट मधून पैसे लंपास झालेले आहेत.
"अनोळखी व्यक्तीची फेसबुक किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि ती स्वीकारल्यावर समोरची व्यक्ती तुमच्या कळत नकळतपणे जास्तच लगट करायला लागली तर संशय घ्यायला शिका. समोर बसलेला व्यक्ती भामटा असू शकतो. या निष्काळजीपणामुळे बरेच सायबर क्राईमचे गुन्हे घडलेले आहेत.
"तुम्हाला 1 लाख पौंडसची लॉटरी लागली आहे आणि ते पैसे मिळवण्यासाठी एका विशिष्ट नंबरला फोन करा किंवा मेसेजला रिप्लाय करा", असा ईमेल किंवा मेसेज आला की संशय घ्यायला शिका. तुम्ही इतर लोकांसारखे फिशिंग अटॅकचे बळी होऊ शकता.
"तुम्हाला आयफोन नऊशे नव्यान्नव रुपयाला मिळतोय किंवा सरकारकडून तुम्हाला फुकट पैसे मिळणार पण तो फायदा मिळवण्यासाठी तुम्ही मेसेज दहा लोकांना शेअर करा", अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला आला तर संशय घ्यायला शिका. तुमची महत्वाची माहिती तुम्ही चुकीच्या माणसाच्या हाती देताय आणि समाजात अफवा पसरवण्यास मदतही करताय.
तुमचा पाल्य हल्ली शांत शांत असतो. घाबरलेल्या अवस्थेत दिसतो. कुणाशी पूर्वीसारखा वागत नाही आणि सतत कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपसमोर सोशल मीडियावर ऑनलाईन असतो तर संशय घ्यायला शिका. तो सायबर स्टॉकिंगचा बळी झालेला असू शकतो.
टेक्नॉलॉजी जितकं तुमचं आयुष्य सुकर करू शकते तितकाच टेक्नॉलॉजी वापरताना निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. म्हणूनच आजच्या जगात नात्यांवर नाही तर तुमच्या बाबतीत घडणाऱ्या वरील घटनांवर संशय घ्यायला शिका व कायम सावध राहा.
धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
तुमचा तंत्रज्ञान मित्र
९२२१२५०६५६
Saturday, 11 August 2018
प्रधानमंत्री बालिका योजना स्कॅम
नमस्ते दोस्तो,
पिछले 3 दिनो से मुझे व्हाट्सअँप पे एक मेसेज आ रहा है जिसमे ऐसे बताया गया है की, "प्रधानमंत्री द्वारा 1 से 18 साल की बालिकाओ की निःशुल्क 10 हजार का चैक दिया जा रहा है. बालिकाओं के भविष्य के लिए इस योजना को चालू किया गया है । आवेदन करने की अंतिम तिथि 15 अगस्त है तो जल्दी करें और इस मैसेज को अपने सभी दोस्तों भेजें ताकि इस योजना का लाभ सभी को मिल सके"
इसमे एक लिंक भी दी गयी है जो गव्हर्नमेंट डोमेन जैसी ही दिखती है. उसमे https भी है और gov.in भी. पर अगर आप ध्यान से देखोगे तो वो लिंक (-gov.in) है बल्की गव्हर्नमेंट की ओरिजनल लिंक होती है (.gov.in). ये सिर्फ एक डेटा कलेक्शन टेक्निक है जिसमे लोगो को फसाया जाता है. ऐसेही कुछ दिन पहले डी-मार्ट व्हाउचर स्कॅम हुवा था जो मैने नीचे दिये गये व्हिडीओ लिंक में समझाया हैं. ऐसी लिंक के पीछे क्या कारण हो सकते है और उसमे क्या सावधानी बरतनी चाहिये वो आपको समज आयेगा.
https://www.youtube.com/watch?v=VSHUaJOznhM
ईस मेसेज को आप आपके यहा पे सेव्ह कर लिजिए और अगर आपको ऐसे कोई मेसेज आये तो उन्हे ये मेसेज रिप्लाय मे भी भेज दिजिये. अपने देश में गलत हॊ रही बातो को रोकना एक भारतीय होने के नाते हमारा फर्ज है.
जय हिंद.
सुबोध अनंत मेस्त्री
आपका टेक फ्रेंड
9221250656
Saturday, 26 May 2018
स्पॅम कॉल्स आणि ऑनलाईन फ्रॉड
१. आपलं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड कस्टमर केअरला फोन करून लगेच ब्लॉक करायचं.
१. स्वतःचे महत्वाचे डॉक्युमेंट्स कुणाला मोबाईल सिमकार्ड घेण्यासाठी देऊ नका. ते कार्ड तुमच्या नावावर रजिस्टर होत आणि अशा फ्रॉडमध्ये तो नंबर वापरला गेला तर तुम्ही गोत्यात येऊ शकता.









