नमस्कार,
ईमेल सर्विसमध्ये सध्या अग्रेसर असणाऱ्या जीमेलने डेस्कटॉप व्हर्जन साठी नुकतेच काही नवे फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत ज्याने आपली बरीच कामे सोपी होणार आहेत आणि स्मार्ट अनुभवही आपल्या वाट्याला येणार आहे.
नवे फीचर्स वापरण्यासाठी जीमेल पेजच्या उजव्या बाजूला असणाऱ्या गेअर आयकनवर क्लिक करायचं आहे (इमेज १) आणि त्यामध्ये "Try new gmail" क्लिक करायचं आहे (इमेज २). हे ऑप्शन घेतल्यानंतर नवा इंटरफेस तुमच्या स्क्रीनवर लगेच लोड होईल.
(१)
(२)
काय आहेत नवे फीचर्स?
१. अटॅचमेंट प्रिव्हिव :
तुमचा ई-मेल ओपन न करताहीआता तुम्हाला अटॅचमेंट ओपन करता येऊ शकतात (इमेज ३)
(३)
२. मेल ऑपेरेशन शॉर्टकट:
ई-मेलवर माऊस घेऊन गेल्यानंतर अर्काइव्ह, डिलीट, मार्क अँज रीड आणि स्नूज असे ऑप्शन दिसतात जेणेकरून त्या ईमेल संबंधी ऑपरेशन्स लगेच करता येऊ शकतात. (इमेज ४)
(४)
३. स्नूज मेल:
या व्हर्जनमध्ये स्नूज ईमेलचा नवा पर्याय देण्यात आला आहे. जसं आपण अलार्म स्नूज करून ठेवतो तस तुम्हाला एखादा ईमेल नंतर रेफर करायचा असेल तर तुम्ही त्या ईमेलला स्नूज करून ठेवू शकता. जेणेकरून तुम्ही सेट केलेल्या वेळी तो ईमेल तुम्हाला मेलबॉक्समध्ये परत दिसेल (इमेज ५ आणि ६)
(५)
(६)
४. कॅलेंडर, कीप आणि गुगल टास्क जीमेलमधूनच :
जीमेल बरोबर बऱ्याच मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे कॅलेंडर, कीप आणि गुगल टास्क तुम्ही जीमेल मधूनच वापरू शकता जेणेकरून त्यासाठी तुम्हाला वेगळी विंडो ओपन करण्याची गरज नाही. (इमेज ७)
(७)
एखादा ईमेल तुम्हाला समोरच्या व्यक्तीला सिक्रेटली पाठवायचा असेल आणि तो ईमेल काही वेळानंतर ओपनच होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते सध्या करू शकता.
त्यासाठी ईमेल पाठवताना कंपोज मेलमध्ये उजवीकडे खाली तुम्हाला "Turn Confidential Mode On/ Off" असा ऑप्शन दिसेल (इमेज ८)
(८)
(९)
जर तुमची ईच्छा असेल कि तो ईमेल फक्त योग्य व्यक्तीनेच वाचावा तर तुम्ही "SMS Passcode" हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता जेणेकरून तुम्ही ईमेल सेंड करताना तुम्हाला मोबाईल नम्बर विचारला जाईल. (इमेज १०)
(१०)
(११)
६. स्मार्ट रिप्लाय:
जीमेलचा हा फिचर यापूर्वीच मोबाईल अँपमध्ये आला होता. तुमचा मेल वाचून त्याच्या अनुषंगाने जीमेल स्वतः तुम्हाला रिप्लाय तयार करून देतो जेणेकरून तुम्हाला टाईप करण्याची गरज पडत नाही. तुम्हाला फक्त तो रिप्लाय सिलेक्ट करून मेल सेंड करायचा असतो. (इमेज १२)
(१२)
जेव्हा कधी तुम्हाला पुन्हा तुमच्या जुन्या जीमेल वर जायचं असेल तेव्हा पुन्हा उजव्या बाजूला असणाऱ्या गियर आयकॉन वर क्लीक करून "Go Back To Classic Gmail" ऑप्शन तुम्ही केव्हाही सिलेक्ट करू शकता. (इमेज १३)
(१३)
!!! एन्जॉय टेकनॉलॉजी !!!
To read this article in English, Click Here.
धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
तुमचा तंत्रज्ञान मित्र
९२२१२५०६५६
#techiteasier #doyouknow #swarajyainfotech #jeevanrang #ileadmylife #gmailfeatures #newgmail #snoozegmail #secretemails #gmailtricks














No comments:
Post a Comment