कालपासून एक लिंक व्हाट्सअपवर मला दोघा-तिघांनी शेअर करून मिळाली. यामध्ये बिगबझार त्याच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त ५००० चे व्हाउचर देत आहे असं दिलं होतं. पहिल्यांदा बघताना ते डोमेनच नाव सुद्धा एकदम बिगबझारच डोमेन असावं असच दिसत होत. अशी ऑफर बघताना ती बऱ्यापैकी उत्सुकता चाळवणारी असते. मी वेबवर डोमेनची रजिस्ट्रेशन डेट पाहिली ती १० एप्रिल २०१८ म्हणजे कालचीच होती. थोडा संशय आला. मी त्या लिंकवर क्लिक करून पाहिलं. समोर बिगबझार संबंधित एकानंतर एक ४ प्रश्न आले. त्यांची उत्तरे दिल्यानंतर त्याने ते लिंक व्हाट्सअप च्या २० ग्रुप किंवा मित्रांना शेअर करायला सांगितलं . अशावेळी फक्त ते व्हाट्सअपच बटन क्लिक केलं तरी त्याचा काउंटर वाढत होता. शेअर करण्याची गरज नव्हती. जेव्हा आयफोनवरून ट्राय केलं तेव्हा या लिंकनंतर मला पुढे ३-४ ऍप डाउनलोड करायला सांगितले. यापुढे जाणं नेहमी धोकादायकच कारण असे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये वायरस आणू शकतात. अँड्रॉइड वरून मुद्दाम पुन्हा ट्राय केलं तेव्हा त्या प्रश्नानंतर तो युट्युब व्हिडीओला घेऊन जात होता.
एकंदरीत यातून ४ गोष्टी साधण्याचा हे समाजकंटक प्रयत्न करत असतात.
१. ऍपचे डाउनलोड वाढावेत
२. ऍपच्या माध्यमातून मोबाईलमध्ये वायरस सोडावा
३. लोकांचा वेळ यावर खर्च व्हावा
४. युट्युबचे व्हीव्ज वाढावेत
यावर मागे ऍमेझॉन ऑफरवर माझं एक आर्टिकल बरंच वायरल झाल होतं. त्याची लिंक इथे पुन्हा शेअर करत आहे. अशा ऑफर्सला बळी न पडता काय काळजी घेतली पाहिजे हे यातून कळेल.
धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
तुमचा तंत्रज्ञान मित्र
#techiteasier #fakeoffers #swarajyainfotech #ileadmylife #jeevanrang #doyouknow
#techiteasier #fakeoffers #swarajyainfotech #ileadmylife #jeevanrang #doyouknow



No comments:
Post a Comment