जेव्हा आपल्या नजरेत असा कोणता पेशन्ट असेल ज्याला पैशाची खूप गरज आहे तुम्ही इथून पैशाची उभारणी करू शकता आणि इथे नाव नोंदणी करण्यासाठी पैशाची गरज नाही.
यासाठी तुम्हाला फक्त खालील गोष्टी करायच्या आहेत.
१. तुमची परिस्थिती शाब्दिक, इमेज आणि व्हिडीओच्या फॉरमॅट मध्ये तिथे मांडायची असते. यात तुम्ही हॉस्पिटलचे रिपोर्ट वैगेरे टाकलेत तर ते अजून पारदर्शकता जाणवून देतात. कमीत कमी शब्दात प्रभावीपणे गोष्टी मांडल्या तर फरक पडतो.
२. तुम्हाला किती पैशाची गरज आहे आणि किती दिवसात ते टाकायचं
३. तुमची ही माहिती त्या पोर्टलमधूनच सोशल मीडियावर शेअर करायची व तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही करायला लावायची.
४. जे काही पैसे येतात त्यातले जवळपास ५% ही वेबसाईट कट करून घेते, काही टक्के पेमेंट ट्रान्सफरचे जातात पण बाकीचे पैसे तुम्ही दिलेल्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात.
यामध्ये बाहेरच्या देशातून पैसे येण्याची सुद्धा सुविधा आहे. कुणाला गरज असेल किंवा यापुढेही पडेल तुम्ही त्यांना https://www.impactguru.com ही वेबसाईट रेकमेंड करू शकता
मी स्वतः ही वेबसाईट अजून वापरलेली नाही पण येत्या काळात कुणाला याची गरजपडू शकते म्हणून माहिती शेअर केली आहे. आजारपण कधीच सांगून येत नाही आणि पैशाचं सोंग आणता येत नाही.
धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री

No comments:
Post a Comment