फोलोवर्स

Wednesday, 13 December 2017

व्हाट्सअँप डिलीट केलेले मेसेजेस वाचण शक्य ?


चुकून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याचा एक उपयुक्त असा फिचर व्हाट्सअँपने काही दिवसापूर्वी नव्या अपडेटमध्ये दिला आणि  बऱ्याच लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.  हे फिचर कस वापरावं हे मी मागच्या आर्टिकलमध्ये विस्तारित रुपात मांडल होतच (व्हाट्सअँपवर चुकून पाठवलेला मेसेज डिलीट करा).  पण जेव्हा पासून "This message was deleted" अस दिसायला लागलं तशी लोकांची उत्सुकता अजून ताणायला लागली कि नक्की मेसेज काय आला होंता?  आणि हेच जाणून घेण आता अगदी सोप झालं आहे.  

कस करायचं?
१. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये "नोटिफिकेशन हिस्टरी"  हे अँप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावं लागेल (अँप स्टोर मध्ये त्या नावाचे बरेच अँप आहेत.  लोगो तपासून घ्या)


२. या अँपला दोन प्रकारच्या परमिशन द्याव्या लागतात 
- मोबाईल सेटिंग मध्ये जाऊन Accessibility ऑप्शन मध्ये जा व तिथे Notification History ला एनेबल करा 





- मोबाईल सेटिंगमध्ये Permission या मेनूमध्ये जा.  त्यात Notification Access असा मेनू असेल.  त्यामध्ये "Notification History" ला एनेबल करा.


   

यापुढे जेव्हा कधी तुम्हाला कोणताही मेसेज तुमच्या मोबाईलमध्ये डिलिवर होतो त्यावेळी हे अँप तो मेसेज नोटिफिकेशन मधून कॅप्चर करते.  तुम्हाला मेसेज डिलीट केलेल्या वेळेचा अंदाज असतोच.  या अँपमध्ये गेल्यावर तो मेसेज डिलीट झालेल्या वेळेतला मेसेज बघा.  तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने सर्च हि करू शकता जेणेकरून त्या व्यक्तीकडून ग्रुपमध्ये किवा पर्सनलवर आलेले मेसेजेस तुम्हाला सहज सापडतील.



एन्जॉय टेकनॉलॉजी

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री 
तुमचा तंत्रज्ञान मित्र
9221250656

#techiteasier #doyouknow #swarajyainfotech #ileadmylife #jeevanrang

Tuesday, 21 November 2017

आता पासवर्ड विसरणे अवघड !!!


  
आपल्या सर्वाना एक नेहमी भेडसावणारी समस्या म्हणजे आपण इंटरनेट वर कुठेही रजिस्टर करू तिथे जर आपण सतत लॉगिन करत नसू तर आपण पासवर्ड विसरतो.  अशावेळी  सगळीकडे सेम पासवर्ड ठेवण्याकडे किंवा पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवण्याकडे आपला कल असतो.  पण गरजेच्या नसणाऱ्या आणि तात्पुरत्या वापरल्या गेलेल्या साईट्सवर सुद्धा सेम पासवर्ड आल्याने काही प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो.  

आपले महत्वाचे व सेक्युअर अकाऊंट्स :
१. बँक अकाऊंट्स (लॉगिन आणि ट्रँजॅक्शन पासवर्ड)
२. पर्सनल (फक्त स्वतःला ऍक्सेस असणारे) ईमेल अकॉउंट 
३. सोशल नेट्वर्किंग अकाऊंट्स  

इतर अकाऊंट्स :
१. पर्सनल  (इतरांना ऍक्सेस असणारे) ईमेल अकॉउंट 
२. अशा बऱ्याच वेबसाईट जिथे कन्टेन्ट पाहण्यासाठी टेम्पररी लॉगिन करावं लागत 

या सगळ्या अकाउंट्सना आपण सेम पासवर्ड ठेवतो आणि त्यामुळे सेन्सिटिव्ह माहितीला धोका राहू शकतो.  सगळे पासवर्ड वेगळे पण सहज लक्षात राहतील अशी ट्रिक आता आपण बघू 

सहसा पासवर्ड जर स्ट्रॉन्ग हवा असेल तर त्याला ३ गोष्टी लागतात 
१. लेटर्स (स्मॉल आणि कॅपिटल)
२. एखादं  स्पेशल कॅरॅक्टर 
३. नंबर्स 

या सगळ्यांच मिळून एक कॉम्बिनेशन बानू शकत.  समजा तुम्ही याहूचा पासवर्ड ठेवत आहात.  तर त्याचा फॉरमॅट असा असेल  
{xyz}{@}{Yahoo}{नंबर}

{xyz}
इथे तुम्ही असं काहीतरी नाव निवडा ज्या गोष्टीचा तुमच्या आयुष्याशी काही संबंध नाही.  आपल्या घरातल्यांची किंवा नातेवाईक यांची नाव निवडायची नाहीत. 

{@}  
इथे आपण एखाद स्पेशल कॅरॅक्टर घ्यायचं.  म्हणजे @ किंवा डॉट किंवा # साइन.  क्वेश्चन मार्क  बऱ्याच ठिकाणी अँक्सेप्ट  करत नाही त्यामुळे तो ना घेणे उत्तम 

{Yahoo} 
ज्या पोर्टल साठी आपण लॉगिन करतोय त्याचा नाव.  म्हणजे याहूसाठी Yahoo.  फेसबुकसाठी fb किंवा फेसबुक असं. 

{नंबर}
इथे तुम्ही तुमच्या आयुष्यातलं एखाद महत्वाचं वर्ष घेऊ शकता किंवा एखादा कोणताही ४ ते सहा अंकी नंबर.  इथे तुमचं किंवा तुमच्या मुलाचं जन्मवर्ष, लग्नाचं वर्ष असं लोकांना माहित असलेलं वर्ष घेऊ नका. 

म्हणजे थोडक्यात फॉरमॅट असा बनेल 
sundaram#Yahoo2906 किंवा sundaram#YAHOO2906

कोणते लेटर कॅपिटल किंवा स्मॉल ठेवायचे हे ठरवून घ्या. हा फॉरमॅट तुम्ही तुमचा स्वतःही ठरवू शकता.  आता या फॉरमॅटमुळे होणारे निरनिराळे पासवर्ड असे असतील 

जीमेलसाठी : sundaram#Gmail2906
ICICI बँकेसाठी : sundaram#Icici2906
HDFC बँकेसाठी : sundaram#Hdfc2906
फेसबुकसाठी : sundaram#Facebook2906
ट्विटरसाठी : sundaram#Twitter2906 

जे आपले इतर अकाउंट्स असतात व सेक्युअर नसतात तिथे सगळीकडे एकच पासवर्ड ठेवायचा जेणेकरून तुम्ही जेव्हाही अशा ठिकाणी लॉगिन कराल तेव्हा तुम्हाला पासवर्ड आठवण्याची गरज भासणार नाही.  

बँकेत लॉगिन आणि ट्रँजॅक्शन पासवर्ड सेम ठेवू शकत नाही. अशावेळी लॉगिन पासवर्ड जर sundaram#Icici2906 असेल तर ट्रँजॅक्शन पासवर्ड SUNDARAM#iCICI2906 असा होईल.  म्हणजे फक्त कॅपिटल आणि स्मॉल लेटर्सचा फरक. 

मी बरेच वर्ष हि टेक्निक वापरतो आहे.  पासवर्ड हि वेगळे आणि लक्षात ठेवण्यासहि सोपे.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री 
तुमचा तंत्रज्ञान मित्र
9221250656

#techiteasier #doyouknow #swarajyainfotech #ileadmylife #jeevanrang

Monday, 30 October 2017

नवं फिचर - व्हाट्सअँपवर चुकून पाठवलेला मेसेज डिलीट करा


"अरे देवा, कुणाचा मेसेज मी कुणाला पाठवला?" किंवा "कोणता मेसेज चुकून कोणत्या ग्रुपवर गेला?" , व्हाट्सअँप वापरताना आपण अशा स्थितीमध्ये बऱ्याच वेळेला अडकतो आणि शेवटी असा वाटत कि आपण हा मेसेज डिलीट करू शकलो असतो तर?  मेसेज पोहचला नसताना  डिलीट करण शक्य होत पण नेट असताना काही सेकंदातच मेसेज डिलिव्हर झालेला असतो.  


ही तुमची स्थिती झाली असेल तर यापुढे घाबरण्याचं कारण नाही.   कारण व्हाट्सअपने तुमचा डिलिव्हर झालेला मेसेज डिलीट करण्याची मुभा तुम्हाला दिली आहे आणि तेही फक्त तुमच्या मोबाईल मधूनच नाही तर समोरच्या व्यक्तीच्या मोबाइलला मधून सुद्धा. 


व्हाट्सअपच्या नुकत्याच आलेल्या व्हर्जन (२.१७.३९५) मध्ये हा ऑप्शन दिला आहे.  जर जे व्हर्जन तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला प्ले-स्टोर (अँपलमध्ये अँपस्टोर) मध्ये जाऊन ते अपडेट करावं लागेल.


मेसेज सगळ्यांसाठी डिलीट कसा करायचा त्याच्या स्टेप्स खाली दिल्या आहेत.


१. जेव्हा तुम्ही कोणत्याही व्यक्तीला मेसेज करता तेव्हा पुढच्या ७ मिनिटामध्ये तुम्ही तो डिलीट करू शकता.  त्यासाठी तुम्हाला त्या मेसेजवर बोटाने प्रेस करून ठेवायचं आहे. वर उजव्या बाजूला डिलीट बटन येत ते क्लीक करायचं आहे. 



२. क्लिक केल्यावर ३ ऑप्शन येतात
 - डिलीट फॉर मी (हा ऑप्शन सिलेक्ट केल्यावर तो मेसेज फक्त तुमच्या मोबाईलमधून डिलीट होईल जे या अगोदरही  होत होत)

-  कॅन्सल (काहीच न होण्यासाठी)

- डिलीट फॉर एव्हरीवन (हा ऑप्शन सिलेक्ट केल्यावर तो मेसेज सगळ्यांच्या मोबाईल मधून किंवा ग्रुप मधून डिलीट होईल)




३.  तुमच्या व्हाट्सअप मध्ये (You deleted this message) असं दिसत राहते. 



४. ज्या व्यक्तीला किंवा ग्रुपवर पाठवले होते तिथे (This message was deleted) असं दिसत राहते. 




म्हणजेच डिलीट केलेल्या मेसेजच नोटिफिकेशन तिथे दिसत राहत (पण हे तुम्ही मोबाईलमधून नॉर्मल मेसेजसारखं डिलीट करू शकता).  या पद्धतीने तुम्ही नॉर्मल मेसेजबरोबरच इमेज किंवा व्हिडीओ सुद्धा डिलीट करू शकता.  




काही महत्वाच्या गोष्टी : 
१.  मेसेज हा फक्त पाठवलेल्या वेळेपासून ७ मिनिटांपर्यंतच डिलीट होऊ शकतो.  नंतर तो डिलीट करता येऊ शकत नाही
२. जर तुम्ही ब्रॉडकास्ट पद्धतीने मेसेज सेंड केला असेल तर तो डिलीट होणार नाही
३. हा फिचर चालण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडे पण व्हाट्सअपचे सेम व्हर्जन असणे गरजेचे आहे.


या अपडेटची आपण खूप वर्ष वाट पाहत होतो आणि शेवटी तो आलाच  😊

एन्जॉय टेकनॉलॉजी

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री 
तुमचा तंत्रज्ञान मित्र
9221250656

#techiteasier #doyouknow #swarajyainfotech #ileadmylife #jeevanrang

Friday, 20 October 2017

व्हाट्सप लाईव्ह लोकेशन शेअरिंग



नमस्कार,

व्हाट्सपमध्ये "लाईव्ह लोकेशन शेअरिंग" च ऑप्शन नव्या अपडेट मध्ये आलं आहे.  यात तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा ग्रुप सोबत काही विशिष्ट वेळासाठी तुमचं  "रिअल टाईम लोकेशन" शेअर करू शकता.    मित्रांना भेटताना लोकेशन शेअर करण्यासाठी किंवा तुमच्या घरातल्या लोकांना तुमच्या सुरक्षिततेची जाणीव करून देण्यासाठी किंवा तुमची ट्रिप एखाद्यासोबत शेअर करण्यासाठी तुम्ही हे वापरू शकता.  हा फचर सध्या अँड्रॉइड आणि अँपल या दोन्ही मोबाईलसाठी उपलब्ध आहे.


*कसे वापराल ?*
१. एखादया विशिष्ट व्यक्तीच किंवा ग्रुपच चॅट ओपन करा
२. जिथे आपण टाइप करतो त्या बॉक्समध्ये उजव्या बाजूला अँटॅचमेन्टच  बटन असेल ते क्लिक करा



३. लोकेशन सिलेक्ट करून त्यात "Share Live Location" क्लीक करा.



४. तुम्हाला किती वेळ ते लोकेशन शेअर करायचे आहे ते सिलेकट करा आणि सेंड क्लिक करा



जर तुम्ही ग्रुपला ते लोकेशन शेअर केले असेल तर ग्रुपवरची प्रत्येक व्यक्ती तुमचं सध्याच लोकेशन पाहू शकते.


*"Send your current Location" आणि "Share Live Location" मध्ये फरक काय?*

"Send your current Location"  ऑप्शन पूर्वीपासून व्हाट्सएप मध्ये आहे.  त्यामुळे दोघातला फरक जाणून घेणं गरजेचं आहे

"Send your current Location"  मध्ये तुम्ही कोणतंही लोकेशन सिलेकट करून समोरच्याला पाठवू शकता. (उदा. घरी बसून आपण ऑफिसच लोकेशनसुद्धा शेअर करू शकतो)

पण  "Share Live Location" मध्ये तुम्ही ज्या जागी आहात तेच लोकेशन समोरच्याला शेअर होत आणि आपण त्यात बदल करू शकत नाही.

या नव्या फिचरचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल यात शंका नाही.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
तुमचा ```तंत्रज्ञान मित्र```

#techiteasier #doyouknow #swarajyainfotech #ileadmylife #jeevanrang

Sunday, 10 September 2017

तुमच्या मोबाईलमधले कॉन्टॅक्ट नंबर सुरक्षित करा



नमस्कार,

संध्याकाळी एका अनोळखी नंबर वरून फोन आला.  तो फोन अरुण सरांनी त्यांच्या मित्राच्या मोबाईलवरून केला होता.  त्यांनी सांगितलं की त्यांचा मोबाईल चोरीला गेला आहे. 

"मोबाईल का कुछ नही यार बस वो कॉन्टॅक्ट नंबर्स नही जाने चाहीये.  उसमे बहोत VIP कॉन्टॅक्टस है।". 

"आपने आपका कॉन्टॅक्टस जीमेल से सिंक किया था क्या?", मी

"पता नही यार", अरुण सर थोड्या नाराजीच्या सुरात म्हणाले.

नंतर त्यांचा मोबाईल सापडला पण फॉरमॅट केल्यामुळे कॉन्टॅक्ट गेले होते.  नव्या मोबाईलमध्ये ती सेटिंग कुठे आणि कशी करायची हे पण त्यांना दाखवलं.  पण झालेला लॉस भरून काढण्यासारखा नव्हता.

बऱ्याच वेळेला फेसबुक न्यूजफीड स्क्रोल करताना मला महिन्यातून एखादा मेसेज दिसतोच की "माझा मोबाईल हरवला आहे आणि सगळे कॉन्टॅक्ट गेले आहेत.  कमेंट बॉक्स मध्ये तुमचे मोबाईल नंबर्स टाका".   आता बऱ्यापैकी लोकांकडे अँड्रॉइड फोन आहेत असं गृहीत धरून तुमचे कॉन्टॅक्ट सेक्युअर कसे करू शकता यासाठी हे आर्टिकल लिहीत आहे.

सर्वाना माहीत असेलच की जेव्हा तुम्ही अँड्रॉइड मोबाईल घेता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला जीमेलचा एक अकाउंट द्यावा लागतो.  तुमचा सध्याचा मोबाईलवरचा ऍक्टिव्ह जीमेल अकाउंट पाहायचा असल्यास तुम्ही प्लेस्टोर ला जाऊन, डाव्या बाजूला वर असणाऱ्या आडव्या छोट्या 3 रेषावर क्लीक करून पाहू शकता (इमेज 1 पहा).  काही  वेळेला आपला मित्र किंवा ओळखीचा कुणी आपल्याला असा अकाउंट कॉन्फिगर करून देतो अशावेळी पासवर्ड तुमच्याकडे असण खूप गरजेचं आहे.




आता जर तुम्हाला तुमचे कॉन्टॅक्ट सेक्युअर करायचे असतील तर तुम्ही पुढील गोष्टी करा

१. तुमच्या मोबाईलच्या सेटिंगस मध्ये जा (इमेज 2)

२. त्यामध्ये Account Management किंवा Accounts मेनू शोधा. (इमेज 3)

३. गूगलचा इमेज 4 मध्ये दाखवल्याप्रमाणे लोगो शोधा व त्यावर क्लीक करा

४. तुमच्या मोबाईलशी कॉन्फिगर केलेला जीमेल अकाऊंट तुम्हाला दिसेल (हे एकापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात).  त्यावर क्लीक करा. (इमेज 5)

५.  त्यामध्ये कॉन्टॅक्ट ऑपशन दिसेल तो ऑन करा (इमेज 6).

ही सेटिंग ऑन केल्यावर तुमचा मोबाईल हरवला किंवा तुम्ही दुसरा मोबाईल घेऊन त्यामध्ये पुन्हा हाच अकाउंट कॉन्फिगर केला तर तुमचे सगळे कॉन्टॅक्ट तुम्हाला पुन्हा मिळतील.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
तुमचा तंत्रज्ञान मित्र

तुम्हाला यापुढे असेच आर्टिकल्स हवे असतील तर खालील लिंकवर क्लीक करून माझा हा ब्लॉग फॉलो करा.


#techiteasier #swarajyainfotech #ileadmylife #jeevanrang #doyouknow #techfriend

Tuesday, 5 September 2017

मुलांच्या मोबाईल गेम्स वर आळा घाला




नमस्कार,

आपण बऱ्याच वेळेला त्रस्त असतो की आपली लहान मुलं मोबाईल वर नको ते गेम डाउनलोड करून खेळत असतात. बऱ्याच वेळेला ते गेम त्या मुलाच्या वयाच्या मानाने अतिशय हिंसक किंवा अश्लील असतात.
त्यात आता "ब्लू व्हेल" गेम च्या चर्चेला उधाण आलय. असे गेम तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यावर तुम्ही बंधन घालू शकता आणि ते अगदी सहज.
जर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता

1. प्ले स्टोर मध्ये जाऊन वर डाव्या बाजूला असणाऱ्या तीन आडव्या रेषा (मेनू) वर क्लीक करा व त्यात सेटिंग मध्ये जा

2. यामध्ये तुम्हाला युजर कंट्रोल सेक्शन खाली Parental Control हा ऑपशन सापडेल त्यावर क्लिक करा


3. त्यामध्ये तो तुम्हाला Parental Control ऑन करण्याचं ऑप्शन देईल. जेव्हा तुम्ही ते ऑन करता तेव्हा तुम्हाला तो एक पिन टाकण्यास सांगतो. तुम्हाला लक्षात राहील व लहान मुलांना माहीत नाही अशी पिन तुम्ही त्यात सेट करू शकता.







4. पिन सेट केल्यावर खाली Content Restriction चा सेक्शन आहे त्यामध्ये तो अँप गेम चा ऑपशन देईल त्यावर क्लिक करा. तो पुन्हा एकदा पिन विचारेल तेव्हा तुम्ही नुकतीच सेट केलेली पिन टाकून व्हेरिफिकेशन करा.


5. इथे तुम्ही कोणत्या वयोगटाच्या पुढचे अँप तुमचा मुलगा खेळू शकतो ते सिलेक्ट करायचं आहे. (अँड्रॉइडच्या प्रत्येक गेम किंवा अँपला रेटिंग दिलेलं असत जस की 3+, 7+, 12+, 16+, 18+ जेणेकरून कोणत्या वयाच्या मुलांसाठी तो गेम किंवा अँप सोयीस्कर आहे हे कळत. )






उदा, तुम्ही फक्त 3+ सिलेकट केलंत तर त्याला सर्च करताना फक्त 3+ एज रेटिंगचेच गेम दिसतील. जर 7+ केलंत तर 3+ आणि 7+ चे अशाप्रकारे 18+ पर्यंत तुम्ही सिलेकट करू शकता.

6. ग्रुप सिलेकट केल्यावर फक्त सेव बटन प्रेस करा.
या सेटिंगमुळे तुमचा मुलगा / मुलगी तुम्ही रिस्ट्रिकट केलेल्या एज रेटिंगपर्यंतच गेम सर्च करू शकेल. त्याला बाकी गेम दिसणार नाहीत.

सूचना : ही सेटिंग तुम्ही अगोदर मोबाईल मध्ये इन्स्टॉल केलेल्या गेम साठी किंवा अँप साठी लागू होत नाही.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
तुमचा ```तंत्रज्ञान मित्र```

#techiteasier #ileadmylife #swarajyainfotech #doyouknow #jeevanrang #restrictunwantedgames

नेटयुग


सध्या नेटयुग जोरदार सुरु आहे. स्मार्टफोनमुळे संपूर्ण जग आपल्या हाताच्या बोटावर आलं आहे. “काय तू व्हाट्सअप/ फेसबुकवर नाहीस? कुठल्या जगात वावरतो राव!.” म्हणजे व्हाट्सअप किंवा फेसबुकवर नसणं म्हणजे जगाच्या कितीतरी मागे असल्याचा एक समज निर्माण झालाय. एखादा इव्हेंट किंवा पिकनिकच सोडाच पण आता लोक कोणत्या हॉटेल मध्ये जेवतायत, कोणतं गाणं ऐकतायत कोणता पिक्चर बघतायत हे सुद्धा पोस्ट करतात. या आभासी जगात व्यक्ती विशेषतः मुलं हरवत चालली आहेत. आता इंटरनेटसुद्धा दिवसेंदिवस स्वस्त होत जाईल. बऱ्याच ठिकाणी डिजिटल इंडियाच्या उपक्रमाखाली वायफाय कनेक्शन लावले जातील आणि या आभासी जगाच्या कक्षा आणखी रूंदावतील. सकाळी झोपतुन उठल्या उठल्या लगेच आपण पहिले व्हाट्सअप चे मेसेजेस चेक करतो आणि मग आपल्या पुढच्या कामाला सुरुवात होते. त्यानंतरही काम करत असताना काही मिनिटांनी आपलं लक्ष या मोबाईल कडे जातंच आणि आपण आपल्या कामापासून वेगळे होतो. सोशल मीडियाचा व्यवस्थित वापर झाला तर त्यासारखं प्रभावी माध्यम कोणतंच नाही. पण याचा गैरवापर होत असेल तर त्यासारखं घातकही काही नाही. तंत्रज्ञानाच्या वापराचं प्रमाण जितकं वाढलं आहे तितकंच सायबर क्राईमच प्रमाण गेल्या काही वर्षात वाढीस लागलं आहे. त्यातल्याच काही गोष्टीचा आढावा घेण्याचा प्रयत्न मी या लेखामार्फत केला आहे.


फेसबुक :
        फेब्रुवारी 2004 ला फेसबुक ची स्थापना झाली आणि आज महिन्याला 170 करोड एवढे युजर फेसबुकचा नियमित वापर करतात. जगाशी संपर्कात राहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे फेसबुक आहे.
Amol More sent you friend request. अरे देवा! अमोल? माझा शाळेतला अगदी जिवलग मित्र. शाळेनंतर त्याच्याशी माझा काहीच संपर्क नव्हता. तो मला फेसबुकवर सापडला. अमोलच नाही तर माझे असे कित्येक जुने मित्र ज्यांच्याशी माझा संपर्क तुटला होता ते फेसबुकच्या माध्यमातून माझ्या पुन्हा संपर्कात आले. कित्येक नवे मित्र तसेच व्यवसाय-नोकरीच्या संधी, नवनविन गोष्टीची माहिती फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते.
ही जरी फेसबुकची चांगली बाजू असली तरी त्याची एक दुसरी भयंकर बाजूदेखील आहे.  दर मिनिटाला कमीत कमी 40 केसेस सायबर क्राईम अंतर्गत जगभरात फेसबुकच्या नावे रजिस्टर होत आल्या आहेत आणि हा आकडा येत्या वर्षांत वाढत राहणार आहे. फेसबुक मध्ये जास्तीत जास्त फसणारा वर्ग हा 12 ते 25 वयोगटातला आहे. काही उदाहरणे जी गेल्या काही वर्षात घडली आहेत ती पाहू.

1. श्रीमंत घरातली एकुलती एक मुलगी. शाळेमध्ये ही हुशार. एका मुलाने तिच्या फ़ेसबुकच्या प्रोफाइल फोटो वर अश्लील कमेंट टाकली म्हणून तिने बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून जीव दिला.

2. कानकोण मध्ये राहणार्‍या एका दहावीतल्या मुलीचं फेसबुकवर चॅट करता करता मुंबईतल्या एका मुलावर प्रेम झालं. कारच्या बाजूला उभा राहून काढलेला फोटो त्याने प्रोफाईल फोटो म्हणून ठेवला होता. मी व्यवसाय करतोय आणि चांगला सेटल आहे असं त्याने तिला भासवून दिलं. तिला लग्नाचं आमिष दाखवून मुंबईला बोलावून घेतलं. सकाळी शाळेच्या निमित्ताने ही मुलगी घराच्या बाहेर पडली आणि ट्रेन पकडून सरळ मुंबईला आली. हा तिला बान्द्रा स्टेशनला घ्यायला आला. तिथून तिला सरळ धारावी झोपडपट्टीमध्ये मित्राच्या घरी घेऊन गेला.  3 दिवस उपभोगून झाल्यावर तिला सांगितलं "तू आता घरी जा. मला तुझ्याशी लग्न करायचं नाही". अशा परिस्थितीत त्या मुलीची काय अवस्था असेल? तिने आत्महत्येचा विचार नाही केला तर नवलच. पालकांची मनस्थिती काय झाली असेल?

3. माध्यप्रदेशमध्ये राहणाऱ्या एका मुलाचं असच चॅटप्रकरणातून एका 22 वर्षाच्या मुलीवर प्रेम झालं. दोघांनी भेटायचं ठरवलं. भेटल्यावर त्याला समजलं की आपण जिला मुलगी समजत होतो ती मुळात 44 वर्षाची एक बाई आहे आणि तिला 3 मुलं आहेत. त्याचा संताप अनावर झाला. त्याच्याकडे एक पिस्तूल होत. ते काढून त्याने तिला तिथेच गोळी घातली व स्वतःही गोळी घालून आत्महत्या केली.

4. एका सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलाचं एका मुलीवर प्रेम होत. काही कारणाने लग्न होऊ शकलं नाही. या मुलाने तिला लग्नानंतर विवाहबाह्य संबंध ठेवायला सांगितले पण तिने साफ नकार दिला. याने रागाच्या भरात तिचे फेसबुक वरचे सगळे फोटो डाउनलोड केले व त्यांना नग्न फोटोजच्या स्वरूपात रूपांतर करून एक वेगळा अकाउंट बनवला आणि त्या अकाउंटमध्ये तिचा नंबर टाकून दिला. लोक तिला कॉल गर्ल म्हणून सतत कॉल करायला लागले. तिने तक्रार केल्यावर सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या.

5. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाच्या वेळी मुंबई बंद होती. तेव्हा पालघरमधल्या एका मुलीने फेसबुक वर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली व एका मुलीने ती लाईक केली. लोकांच्या भावना दुखावल्यामुळे दोघीनाही अटक करण्यात आली.

6. राजकारण्यावरून जोक्स बनवणे किंवा त्यांची व्यंगचित्र बनवून भ्रष्टाचाराबद्दल वाच्य करणे, आक्षेपार्ह कमेंट टाकणे अशा तर शेकडो केसेस मध्ये लोकांना जेल बघावं लागलं आहे.

7. " Enjoying holiday with whole family at Kerala", अशी फेसबुकवरची तुमची पोस्ट म्हणजे चोरांना आणि दरोडेखोरांना खुलं निमंत्रण असत. अशा पिकनिकला गेलेल्या फॅमिलीच्या घरी चोरीच्या कितीतरी केसेस दाखल झाल्या आहेत

8. आपल्या पत्नीच्या किवा प्रेयसीच्या आणि याउलट नवर्‍याच्या किंवा प्रियकरच्या फोटोला कोण लाइक करत आणि कमेंट करत यावरूनसुद्धा भांडण होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलेली आहेत.

9. ‘आज माझ्या मुलीचा शाळेचा पहिला दिवस. एक बाप म्हणून मला तिचा किती अभिमान वाटतोय. या युनिफोर्म मध्ये किती सुंदर दिसतंय माझं पिल्लू! शाळा साडेतीनला सुटणार. शाळेत काय काय झालं हे पिल्लुच्या तोंडून ऐकायला पप्पा अतुरणार...feeling excited.’ अशी पोस्ट एखादा माणूस फेसबुकवर टाकतो. सोबत मुलीचा युनिफोर्ममधला सुंदर फोटो. त्याच्या हे लक्षात येत नाही कि फेक अकाउंट बनवून त्याचं फेसबुकवर मित्र झालेल्या इसमाने तो फोटो डाऊनलोड केला आहे आणि सौदी अरेबियामध्ये एका अरब करोडपतीला तो पाठवलादेखील. ‘वय ४ वर्ष. वर्ण गोरा. उंची साधारण ३.५ फुट. किमत ........डॉलर्स’.
बाप मुलीला घ्यायला ३.३० वाजता शाळेत येतो. ती सापडतच नाही. ‘तुमचा भाऊ आला होता. तुम्ही हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहात असं सांगून घेऊन गेला.’ कोण भाऊ? कोण घेऊन गेलं? तुम्ही गोंधळून जाता. तुम्ही कल्पनादेखील करू शकत नाही की तुमच्या काळजाचा तुकडा, कोण्या अनोळखी व्यक्तीसोबत देश सोडून चाललाय...त्या अरबी माणसाने तिला विकत घेतलंय आणि आता ती परत कधीच तुमच्याकडे परतणार नाही...किती भयंकर आहे हे सगळं...

फेसबुक हे लोकांशी संपर्क साधण्याच उत्तम माध्यम असेल तरी ते वापरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

1. आपली कोणतीही गोपनीय माहिती, मग ती टेक्स्ट, व्हिडिओ, ऑडिओच्या माध्यमात फेसबुक वर ठेवू नका.

2. आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट फेसबुक वर यायलाच पाहिजे असं नाही. ती झाल्यानंतर पण तुम्ही पोस्ट करू शकता. या खुल्या इंटरनेटच्या जगात कोण तुम्हाला फॉलो करत असेल तुम्ही अंदाज लावू शकत नाही.

3. शक्यतो, मुलींनी त्यांचे फोटो फेसबुकला टाकताना काळजी घ्यावी. ते फोटो शक्यतो आपल्या एकदम जवळच्या आणि खास ओळखीमधल्या व्यक्तींना दिसतील अशीच सेटिंग करावी. मुलींच्या फोटोजचा दुरुपयोग केलेल्याच्याही बऱ्याच केसेस आहेत.

4. फेसबुक केव्हाही सायबर कॅफे किवा अशा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणावरून वापरू नका.  इथे असणार्‍या मशीन मध्ये बर्‍याच वेळेला वायरस असतात ज्याने तुमचे पासवर्ड हॅक होऊ शकतात व तुमच्या अकाऊंट मधून तुमच्या मित्रांना काही विचित्र पोस्ट जाऊ शकतात.  हा प्रकार खूप प्रमाणात झाला आहे.


व्हाट्सअप :

अलीकडच्या काळात व्हाट्सअप एवढं फेमस झालंय कि त्याने SMS चा बिजनेस जवळजवळ फस्तच करून टाकला आहे.  “काही असेल तर व्हाट्सअप कर असं आपण सहज म्हणून जातो”.  आजच्या घडीला व्हाट्सअपवर वेगवेगळ्या देशातून करोडो युजर्स अँक्टिव्ह असतात.  त्यात मोठमोठे उद्योजक, राजकारणी, सिनेस्टार्स आणि लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत विविध वयोगटातली वापरकर्ते आहेत.  व्हाट्सअपने संवादाला एक वेगळंच स्वरूप दिलेलं आहे.  व्हर्चुअल संवादात पूर्वी ‘याहू’सारखे मेसेंजर होतेच पण मोबाईलवर चॅट साठी इतकं सोपं आणि उपयुक्त अँप्लिकेशन नव्हतंच. त्यामुळे खूप कमी वेळात व्हाट्सप ने खूप प्रसिद्धी मिळवली.  आता व्हाट्सप नसेल तर तो माणूस कालबाह्य समजला जातो.  व्हाट्सप नंतर बऱ्याच अँप्लिकेशनने डोकं वर काढण्याचा प्रयत्न केला पण लोकांची व्हाट्सप ची सवय ते मोडू शकले नाहीत.  व्हाट्सपचा उपयोग बऱ्याच ठिकाणी चांगला होऊ शकतो जस की,
1. प्रत्यक्ष भासणारा पण अप्रत्यक्ष असा संवाद
2. फोटोज, व्हिडिओ, PDF सारखे डोक्यूमेन्ट सहज शेअर होतात ज्यामुळे बऱ्याच लोकांना विशेषतः उद्योजकांना फायदा होतो.
3. ग्रुपमुळे बऱ्याच लोकांशी एकत्र संवाद साधला जाऊ शकतो.  विचारांची देवाण घेवाण होते.  नवनवीन गोष्टी माहिती पडतात.
4. कोणतीही इंफॉर्मशन काही मिनिटांमध्ये जगापर्यंत सहज पोहचू शकते.
5. हरवलेली माणसे सापडतात
6. लोकांना कोणत्याही धोक्याची पूर्वसूचना देता येते आणि त्यामुळे त्यांना सावध करता येते.

जसे व्हाट्सप चे फायदे झालेत त्याचप्रमाणे तोटे ही खूप झाले आहेत.
1.   चुकीची माहिती जगापर्यंत लगेच पोहचते.  कोणतीही पोस्ट आल्यानंतर लोक सहसा ती पडताळून पाहत नाहीत आणि सहज फॉरवर्ड करून मोकळे होतात. या चुकीच्या मेसेजेचे ही काही प्रकार आहेत.
Ø  एखाद्या व्यक्तिला रक्ताची गरज आहे असे बरेच मेसेज फिरतात.  त्यात बर्‍याच वेळेला नंबर सुद्धा असतात.  पण असे मेसेज काही वेळेला जुने असतात किवा चुकीचे असतात.  आपण त्या नंबरवर कॉल न करता ते मेसेज फॉरवर्ड करण्यात पुण्य मानतो.  अशीच गत हरवलेल्या व्यक्तींच्या फोटोबाबत पण होत असते.
Ø  माणूस सर्वात जास्त घाबरतो तो देवाला.  एखादा मेसेज येतो देवाच्या नावाने आणि तो मेसेज पुढे फॉरवर्ड करण्याची धमकीवजा सूचना असते आणि तस न केल्यास त्या 2-3 दिवसात काहीतरी वाईट बातमी मिळेल असे लिहिलेले असते.  आणि लोक घाबरून ते मेसेज फॉरवर्ड करून पुण्य कमावतात. जणू काही  देव, किती लोकांना मेसेज फॉरवर्ड केला जातोय याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवत असतो.
Ø  ऑफरचे मेसेज तर भरभरून येत असतात.  एखाद्या मोठ्या कंपनीच नाव घेऊन (जस की, अमेझॉन, फ्लिपकार्ट) धमाका सेल ऑफरच्या नावाखाली 799 रुपयात मोबाइल, टीव्ही किवा अशी कोणतीही महाग गोष्ट अशा आशयाचा मेसेज हा असतो.  एक तर लोक त्या लिंक वर क्लिक करून स्वतच्या मोबाइल मध्ये वायरस तरी डाऊनलोड करतात किवा स्वतच्या मोबाइल मधली महत्वाची माहिती दुसर्‍याला देऊन तरी टाकतात.  माझ्या “ऑफर नको रे बाबा” या आर्टिकल मध्ये हे मी सविस्तर मांडल होतं.
Ø  एखादी मोठी व्यक्ति मृत पवल्याचे मेसेज तर वार्‍यासारखे पसरतात.  एक सोप्पं लॉजिक लोकांना समजत नाही की जर एखादी प्रसिद्ध व्यक्ति मरण पावली तर ती बातमी न्यूज चॅनलला लगेच दाखवली जाते किवा गूगल वर पण लगेच समजते.  पण लोक स्वता काही पडताळून न पाहता या दिग्गजांना त्यांच्या जिवंतपणी श्रद्धांजलि वाहत राहतात.
Ø  एखादा फोटो किवा मेसेज जर 10 ग्रुपला फॉरवर्ड केला तर त्या मेसेज मधली दिसणारी इमेज किवा माहिती आपोआप बदलते असे मेसेज ही व्हाट्सअप वर फिरत राहतात. ज्यात काही तथ्य नाही.

2.   पोर्न मेसेजेस किवा फोटोज, ऑडिओ क्लिप्स हे शेअर कारण व्हाट्सअप मुळे सहज शक्य झाल आहे आणि त्यामुळेच अगदी लहान वयोगाटाल्या मुलांनाही अशा गोष्टींचा वापर अगदी सहज मिळतो.
3.   धर्माबद्दल तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, अपघातच्या पोस्ट, मर्डर क्लिप्स अशा नकारात्मक भावना आणणार्‍या बातम्या अथवा माहिती सहज नजरेखालून जात असते आणि कुठे न कुठे आपल्या सुप्त मनावर त्याचा खोलवर  परिणाम होत असतो.
4.   व्हाट्सअप सारख्या आभासी संवादामुळे प्रत्यक्ष संवाद खूप कमी होत चालला आहे.  लोक प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा चॅट वर बोलण्यात जास्त धन्यता मानतात.
5.   व्हाट्सअपचे मेसेज जर रात्री 2 किवा 3 नंतर डिलीट केले असतील तर ते आदल्या दिवशीच्या बॅकअप मध्ये राहतात व ते मेसेजेस कधीही रिस्टोर करता येतात.  2013 च्या एकाच वर्षात जवळ जवळ 5000 घटस्फोटाच्या केसेस व्हाट्सअप किवा फेसबुक मुळे दाखल झाल्या होत्या.  पत्नीवर संशय किवा पतीवर संशय म्हणून मेसेजेस रिस्टोर करून त्यांचं बाहेर प्रकरण चालू आहे हे समजल्यामुळे यातल्या बर्‍याचशा केसेस झाल्या होत्या.
6.   लोकांना व्हाट्सअपच व्यसन लागल आहे.  मेसेज येवो न येवो, दर मिनिटाला आपोआप मोबाइल वर हात जातो आणि मेसेज चेक केला जातो.  या प्रकारामुळे एखाद्या गोष्टीकडे एकाग्रता लावणे हे कठीण होऊन बसले आहे. विशेषता हा प्रकार कॉलेज च्या मुलांमध्ये जास्त पहिला जातो.


 व्हाट्सअप वापरताना काही खालील गोष्टींची आवर्जून काळजी घेतली पाहिजे.

1.   राजकीय वर्तुळाची खिल्ली उडवणारे किवा कुणाच्याही भावना दुखवणारे मेसेज फॉरवर्ड करू नका.  त्याने तुम्हाला अटक ही होऊ शकते.
2.   अनोळखी व्यक्तींशी सहसा जास्त वेळ बोलू नका आणि स्वतची कोणतीही सीक्रेट माहिती त्यांना शेअर करू नका
3.   जर एखादी व्यक्ति तुम्हाला सतत कोणते न कोणते मेसेज पाठवत असेल आणि तुम्हाला त्या व्यक्तीचे मेसेजेस नको असतील तर तुम्ही त्या व्यक्तीला ब्लॉक ही करू शकता जेणेकरून त्या व्यक्तीला तुमचे प्रोफाइल पिक्चर ही दिसणार नाही व त्याचे मेसेज ही तुम्हाला येणार नाहीत
4.   अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या कोणत्याही मेसेज मधल्या फाइलला डाऊनलोड करू नका.  त्या फाइलमधून तुमच्या मोबाइल मध्ये वायरस सुद्धा शिरू शकतो
5.   व्हाट्सअप किवा कोणत्याही डिजिटल संवादामध्ये समोरच्या व्यक्तिला मग भले ती ओळखीची असेल, बँक डिटेल्स, पिन नंबर, क्रेडिट कार्ड नंबर अशी सीक्रेट माहिती पाठवू नका.  हे कोणतेही संवाद कितपत सुरक्षित आहेत हे आपण सांगू शकत नाही.



ई-मेल्स
     ईमेल ही सगळ्यांच्या नियमित वापरातली गोष्ट आहे.  पण या ईमेल वरून सुद्धा बर्‍याच प्रकारचे फसवे प्रकार आतापर्यंत झाले आहेत.
1.    तुमचा बँकेचा पासवर्ड एक्सपायर झाला आहे किवा तुमची माहिती बँकेच्या अकाऊंट मध्ये अपडेट करायची आहे अशा प्रकारचा बँकेतून आला आहे अस भासवणारा एखादा मेल तुम्हाला येतो आणि तुम्ही त्या लिंक वर क्लिक केलीत तर अगदी बँकेच्या वेबसाइटसारखी दिसणारी स्क्रीन तुमच्या समोर ओपन होते.  त्यात तुमचा एटीएम कार्ड नंबर, यूजर आय डी पासवर्ड, पिन नंबर अशा गोष्टी विचारलेल्या असतात.  तुम्ही ती माहिती बदलायची म्हणून सगळी माहिती टाकता आणि तुमची ती माहिती एखाद्या हॅकर कडे जाऊन पोहचते.  तो हॅकर नंतर तीच माहिती वापरुन तुमचा बँक अकाऊंट रिकामी करू शकतो. अशाच गोष्टी फसव्या फोन कॉल मधून ही केल्या जातात. यातून वाचण्यासाठी फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा
Ø  कोणतीही बँक तुम्हाला तुमची सीक्रेट इन्फॉर्मेशन फोनवर किवा इंटरनेट च्या माध्यमातून विचारात नाही.  त्यामुळे असे मेल आले तर बँकेत फोन करून ते आधी कन्फर्म करा.
Ø  कोणतीही व्यवहारासाठी वेबसाइट वापरताना, मग ती बँकेची असेल किवा ऑनलाइन शॉपिंगची, त्याच्या लिंक मध्ये http:// ऐवजी https:// आहे का ते पहा.  हा (s) तुमची माहिती एनक्रिप्ट करून पुढे पाठवत असतो आणि त्यामुळे तुमचे व्यवहार सुरक्षितरित्या होत असतात.  जर हा (s) नसेल तर कोणतेही व्यवहार तुम्ही त्या वेबसाइट वर करू नका.
2.    तुमच्या ओळखीतल्याच एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला ईमेल येतो की, ते बाहेरगावी आहेत आणि त्यांचा फोन हरवला आहे.  सध्या त्यांच्याकडे ईमेल शिवाय काहीच संवादाच साधन नाही व त्यांना सध्या पैशाची गरज आहे.  मदत करू शकत असाल तर ईमेलला रीप्लाय करा वैगेरे.  अशा वेळी आपण भावूक होऊन ईमेलला रीप्लाय करतो आणि जाळ्यात ओढले जातो.  ही सुद्धा तुमच्या कडून पैसे काढण्याची एक युक्ति असू शकते कारण असे मेल त्या व्यक्तीच अकाऊंट हॅक करून सगळ्यांना पाठवलेले असतात.  अशा वेळी एकदा त्या व्यक्तीचा फोन ट्राय करून खात्री करून घ्या आणि त्यांना या गोष्टीची कल्पना द्या.
3.    ईमेलवरून किवा मोबाइलवर सुद्धा लॉटरीचे खूप मेसेजेस येतात त्यात तुम्ही कितीतरी करोडो रुपये जिंकला आहात अस सांगितलं जात.  बक्षीस घेण्यासाठी या मेलला रीप्लाय करा असही सांगितलेलं असत.  हे ईमेल सुद्धा पैसे तुमच्याकडून काढण्याच्या हिशोबानेच बनवलेले असतात.  त्यामुळे अशा मेलला रीप्लाय न करणच नेहमी योग्य.

तंत्रज्ञान हे आपल्या सोईसाठी बनवले आहे. आपला जन्म तंत्रज्ञानासाठी झालेला नाही. त्यामुळे फेसबुक किंवा व्हाट्सअप  चेक करण्याच्या दिवसभरातल्या वेळा ठरवा. उदाहरणार्थ सकाळी प्रवासात असताना, दुपारी जेवल्यानंतर, संध्याकाळी प्रवासात असताना वैगरे. एकदा ही सवय लागली कि कामाच्या मध्ये फेसबुक किंवा व्हाट्सअप चाळण्याचा मोह होणार नाही.
या गोष्टींचा वापर आपल्या सोई पुरताच बरा. आज नकळतपणे या गोष्टींना आपण आहारी जात आहोत. या माध्यमांद्वारे आपण लांब असलेल्या व्यक्तींशी संवाद साधत असतो आणि जवळ असलेल्या व्यक्ती हरवत चाललो आहे. म्हणतात ना फेसबुकवर २,५०० मित्र, व्हाट्सअपवर ४०० काँटॅकट्स पण जेव्हा आयसीयू मध्ये होतो तेव्हा बाहेर फक्त माझी बायको, मुलं आणि आई वडील होते...ज्यांनामी कधीच वेळ दिला नाही.

तंत्रज्ञान जितकं तुमचं आयूष्य सोप करतय तितकच त्याच्या चुकीच्या वापरणे ते घातक सुद्धा होऊ शकत.  दैनंदिन जीवनात याचा वापर करताना आपण नेहमीच काळजी घेतली पाहिजे.  या आर्टिकलच्या माध्यमातून मी महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याच काम केल आहे.  याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल याबाबत शंका नाही.

जीवनरंग संस्थेच्या अंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल नेहमी काही ना काही नवीन गोष्टीबद्दल माहिती दिली जाते.  एखादया गोष्टीने कुणाचा फायदा होत नसेल तर नुकसान होण्यापासून बचाव व्हावा अशी अपेक्षा असते. ‘फेकून द्या कचरा, घरातला आणि मनातला’ या जीवनरंग प्रकाशनाच्या आगामी पुस्तकामधला हा एक छोटासा भाग होता. या आर्टिकलमुळे नक्कीच तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर तुमच्याकडून होईल ही अपेक्षा मी बाळगतो.
धन्यवाद!


- सुबोध अनंत मेस्त्री                                    
(वक्ता, सॉफ्टवेअर इंजीनियर)                                
9221250656                                          
https://www.facebook.com/subodhmestry0906
http://www.swarajyatech.com
http://sahajsaral.blogspot.in


#techiteasier