फोलोवर्स

Sunday, 9 November 2025

फेसबुक अकाउंट क्लोन

 



नमस्कार,

बऱ्यापैकी लोकांचे अकाउंट्स सध्या क्लोन होत आहेत. काही लोकांना अकाउंट हॅक झालाय असं वाटतं पण हॅकिंग आणि क्लोनिंग मध्ये फरक आहे.  हॅकिंग म्हणजे पूर्णपणे तुमचा पासवर्ड आणि अकाउंटचा ऍक्सेस घेऊन तुमचा अकाउंट चालवणे आणि क्लोनिंग म्हणजे तुमचा फोटो आणि माहिती वापरून नवीन अकाउंट ओपन करून तुमच्या मित्रांना पैशासाठी मागणी करतात. 

जर तुमचा अकाउंट क्लोन होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात सोपं म्हणजे तुमची फ्रेंड लिस्ट फेसबुकवर प्रायव्हेट करा.  जेणेकरून जरी एखाद्याने तुमचा फोटो वापरून अकाउंट तयार केला तरीही तुमची फ्रेंडलिस्ट त्याला दिसत नसल्याने तो कुणाला रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही आणि त्यामुळे क्लोनिंगची शक्यता आपोआप कमी होते. 

फ्रेंड लिस्ट प्रायव्हेट करण्यासाठी सोप्या स्टेप्स:
१. लॅपटॉपसाठी वर उजव्या वाजूला तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा.  मोबाईलसाठी खाली उजव्या बाजूला प्रोफाइल फोटो टॅप करा आणि स्क्रोल करा.   
२. सेटीन्ग्स अँड प्रायव्हसीमध्ये जा आणि तिथून सेटीन्ग्स मध्ये जा. 
३. डाव्या बाजूला  "How people can find and contact you?" वर क्लिक करा.  
४. उजव्या बाजूला "Who can see your friend list?" मध्ये "Only Me" सिलेक्ट करा. 





तुमच्या या एका स्टेपने काही लोकांचे पैसे वाचू शकतात. 

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री

No comments:

Post a Comment