फोलोवर्स

Friday, 20 October 2017

व्हाट्सप लाईव्ह लोकेशन शेअरिंग



नमस्कार,

व्हाट्सपमध्ये "लाईव्ह लोकेशन शेअरिंग" च ऑप्शन नव्या अपडेट मध्ये आलं आहे.  यात तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा ग्रुप सोबत काही विशिष्ट वेळासाठी तुमचं  "रिअल टाईम लोकेशन" शेअर करू शकता.    मित्रांना भेटताना लोकेशन शेअर करण्यासाठी किंवा तुमच्या घरातल्या लोकांना तुमच्या सुरक्षिततेची जाणीव करून देण्यासाठी किंवा तुमची ट्रिप एखाद्यासोबत शेअर करण्यासाठी तुम्ही हे वापरू शकता.  हा फचर सध्या अँड्रॉइड आणि अँपल या दोन्ही मोबाईलसाठी उपलब्ध आहे.


*कसे वापराल ?*
१. एखादया विशिष्ट व्यक्तीच किंवा ग्रुपच चॅट ओपन करा
२. जिथे आपण टाइप करतो त्या बॉक्समध्ये उजव्या बाजूला अँटॅचमेन्टच  बटन असेल ते क्लिक करा



३. लोकेशन सिलेक्ट करून त्यात "Share Live Location" क्लीक करा.



४. तुम्हाला किती वेळ ते लोकेशन शेअर करायचे आहे ते सिलेकट करा आणि सेंड क्लिक करा



जर तुम्ही ग्रुपला ते लोकेशन शेअर केले असेल तर ग्रुपवरची प्रत्येक व्यक्ती तुमचं सध्याच लोकेशन पाहू शकते.


*"Send your current Location" आणि "Share Live Location" मध्ये फरक काय?*

"Send your current Location"  ऑप्शन पूर्वीपासून व्हाट्सएप मध्ये आहे.  त्यामुळे दोघातला फरक जाणून घेणं गरजेचं आहे

"Send your current Location"  मध्ये तुम्ही कोणतंही लोकेशन सिलेकट करून समोरच्याला पाठवू शकता. (उदा. घरी बसून आपण ऑफिसच लोकेशनसुद्धा शेअर करू शकतो)

पण  "Share Live Location" मध्ये तुम्ही ज्या जागी आहात तेच लोकेशन समोरच्याला शेअर होत आणि आपण त्यात बदल करू शकत नाही.

या नव्या फिचरचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल यात शंका नाही.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
तुमचा ```तंत्रज्ञान मित्र```

#techiteasier #doyouknow #swarajyainfotech #ileadmylife #jeevanrang

No comments:

Post a Comment