नमस्कार,
आपण बऱ्याच वेळेला त्रस्त असतो की आपली लहान मुलं मोबाईल वर नको ते गेम डाउनलोड करून खेळत असतात. बऱ्याच वेळेला ते गेम त्या मुलाच्या वयाच्या मानाने अतिशय हिंसक किंवा अश्लील असतात.
त्यात आता "ब्लू व्हेल" गेम च्या चर्चेला उधाण आलय. असे गेम तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यावर तुम्ही बंधन घालू शकता आणि ते अगदी सहज.
जर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता
1. प्ले स्टोर मध्ये जाऊन वर डाव्या बाजूला असणाऱ्या तीन आडव्या रेषा (मेनू) वर क्लीक करा व त्यात सेटिंग मध्ये जा
2. यामध्ये तुम्हाला युजर कंट्रोल सेक्शन खाली Parental Control हा ऑपशन सापडेल त्यावर क्लिक करा
3. त्यामध्ये तो तुम्हाला Parental Control ऑन करण्याचं ऑप्शन देईल. जेव्हा तुम्ही ते ऑन करता तेव्हा तुम्हाला तो एक पिन टाकण्यास सांगतो. तुम्हाला लक्षात राहील व लहान मुलांना माहीत नाही अशी पिन तुम्ही त्यात सेट करू शकता.
4. पिन सेट केल्यावर खाली Content Restriction चा सेक्शन आहे त्यामध्ये तो अँप गेम चा ऑपशन देईल त्यावर क्लिक करा. तो पुन्हा एकदा पिन विचारेल तेव्हा तुम्ही नुकतीच सेट केलेली पिन टाकून व्हेरिफिकेशन करा.
5. इथे तुम्ही कोणत्या वयोगटाच्या पुढचे अँप तुमचा मुलगा खेळू शकतो ते सिलेक्ट करायचं आहे. (अँड्रॉइडच्या प्रत्येक गेम किंवा अँपला रेटिंग दिलेलं असत जस की 3+, 7+, 12+, 16+, 18+ जेणेकरून कोणत्या वयाच्या मुलांसाठी तो गेम किंवा अँप सोयीस्कर आहे हे कळत. )
उदा, तुम्ही फक्त 3+ सिलेकट केलंत तर त्याला सर्च करताना फक्त 3+ एज रेटिंगचेच गेम दिसतील. जर 7+ केलंत तर 3+ आणि 7+ चे अशाप्रकारे 18+ पर्यंत तुम्ही सिलेकट करू शकता.
6. ग्रुप सिलेकट केल्यावर फक्त सेव बटन प्रेस करा.
या सेटिंगमुळे तुमचा मुलगा / मुलगी तुम्ही रिस्ट्रिकट केलेल्या एज रेटिंगपर्यंतच गेम सर्च करू शकेल. त्याला बाकी गेम दिसणार नाहीत.
सूचना : ही सेटिंग तुम्ही अगोदर मोबाईल मध्ये इन्स्टॉल केलेल्या गेम साठी किंवा अँप साठी लागू होत नाही.
धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
तुमचा ```तंत्रज्ञान मित्र```
#techiteasier #ileadmylife #swarajyainfotech #doyouknow #jeevanrang #restrictunwantedgames








No comments:
Post a Comment